Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

एमआयडी परिसरात वाहनात ओढून महिलेवर बलात्कार





परभणी ➡️  वाहनात ओढत एका महिलेवर बलात्कार करण्यात आला असल्याची खळबळजनक घटना बुधवारी (दि.30) दुपारी घडली. या प्रकरणी पिडीत महिलेने नवामोंढा पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री उशीरा दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

प्राप्त माहितीनुसार वसमत रस्त्यावरील एमआयडीसी परिसरातून आपण बुधवारी दुपारी जात असताना एका चारचाकी वाहनातील व्यक्तीने जबरदस्तीने वाहनात ओढून घेतले. त्यावेळी महिलानी ओरडून त्याला विरोध केला. परंतु त्या वाहनाच्या चालकाने चाकू दाखून धमकावले. त्यानंतर वाहनातील अन्य व्यक्तीने जबरदस्तीने बलात्कार केला, असे 26 वर्षीय पिडीत महिलेने नवामोंढा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित महिला 26 वर्षीय असून तिने नवामोंढा पोलिसांना दिलेल्या तक्रारीत आरोपींचे वर्णन केले आहे. त्यानुसार पोलीस पथक तयार करण्यात आले असून, ते आरोपींचा शोध घेत आहेत. या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपी निष्पन्न करण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच या घटनेमागे जुना काही इतिहास आहे, का याची देखील तपासणी पोलीस करत आहेत. या प्रकरणाचा तपास महिला फौजदार भावसार या करत असून, लवकरच गुन्ह्याची उकल करून आरोपी पकडण्यात येईल असेही पोलीस निरीक्षक तट यांनी सांगितले.




Post a Comment

0 Comments