Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

स्प्रे मारून पैश्यांची बॅग पळविणारास चोरांचा पाठलाग करून पकडले





परभणी
➡️ दुचाकीवरून जाणार्‍यावर स्प्रे मारून मारहाण करीत बॅग हिसकावून पळ काढणार्‍यास पाठलाग करून पकडले. ही घटना बुधवारी (दि. 30) रात्री 9.30 वा. सुमारास शहरातील रंगनाथ महाराज नगरात घडली. या घटनेत दुचाकीवरील दोघांना मोठा मार लागला असतानाही चोरट्यास त्यांनी पकडले. या प्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात गुरुवारी (दि.31) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार रंगनाथ महाराज नगरातील रहिवाशी विनोद देवराव चव्हाण हे त्यांच्या पुतण्यासोबत दुचाकीवरून बुधवारी (दि.30) रात्री गुरुकृपा बॅग हाऊस हे दुकान बंद करून घरी जात होते. रात्री 9.30 वा. सुमारास घराजवळ असतानाच त्यांची दुचाकीही स्लो झाली. त्याचवेळी तेथे उभ्या असलेल्या आरोपी सय्यद इरफान सय्यद मोईनोद्दीन (रा. परळी) त्यांच्यावर स्प्रे मारून अचानक मारहाण सुरू केली. अचानक झालेल्या या घटनेने दुचाकीवरील दोघेही घाबरून गेले. याच झटापटीत त्या चोरट्याने हातातील रोख रक्कम असलेली बॅग हिसकावून पळ काढला. त्या बॅगमध्ये 09 हजार 800 रुपयांची रोख रक्कम होती. मात्र, अचानक झालेल्या झटापटीतील जखमी झालेल्या विनोद चव्हाण यांच्यासह पुतण्याने त्या चोरट्याचा पाठलाग केला. त्यास पकडले. याबाबत नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 




Post a Comment

0 Comments