Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

सेवानिवृत्तीबद्दल नसीर खान अब्दुल्ला खान यांचा सत्कार





परभणी ➡️ शहर महानगरपालिकेतील संकीर्ण विभागातील कर्मचारी नसीर खान अब्दुल्ला खान हे गुरूवारी (दि.31) रोजी सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

नसीर खान अब्दुल्ला खान 35 वर्ष महानगरपालिकेत सेवा केली. यापुर्वी त्यांनी मनपाच्या आरोग्य विभागात काम केले. त्यानंतर त्यांनी संकीर्ण विभागात काम केले. यावेळी नसीर खान अब्दुल्ला खान यांचा महानगरपालिका उपायुक्त महेश गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्री गायकवाड यांनी त्यांनी आपल्या खुर्ची बसवून सन्मान केला. अधिका-यांनी केलेल्या या सन्मानामुळे नसीर खान अब्दुल्ला खान भारावून गेले. यावेळी बोलतांना श्री गायकवाड म्हणाले, अस्थापना विभागातील कर्मचा-यांना कामकाजात येणार अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे म्हणाले. 

कार्यक्रमास शिक्षण सभापती विकास लंगोटे, माजी नगरसेवक मोहम्मद नईम,अस्थापना विभागप्रमुख अल्केश देशमुख, नगरसचिव विकास रत्नपारखे, महापौराचे स्वीय सहाय्यक अभिजीत कुलकर्णी, आयुक्तांचे स्वीय सहाय्यक उमेश जाधव, संकीर्ण विभागप्रमुख राजकुमार जाधव, लेखा विभागाचे डंबाळे, अस्थापना विभागाचे कोळशिकवार,उदय भंडे, मालमत्ता व्यवस्थापक नसिरोद्दीन काजी, रंगनाथ गरूड, रहीम खान, करीम खान, हबीब भाई, संगणक विभागप्रमुख अदनान कादरी, सेवानिवृत्त फौजदार आर.आर.रोडे, मो.समी, शहाणे, पिंपळे आदीची उपस्थिती होती. मनपाच्या वतीने करण्यात आलेला हा सत्कार व दिलेला मान कधीही विसरू शकणार नाही, असे नसीर खान अब्दुल्ला खान म्हणाले. संकीर्ण,अस्थापना व आरोग्य विभागाच्या वतीने सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.




Post a Comment

0 Comments