Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

कोरोनाच्या नव्या प्रकाराचे 6 रुग्ण भारतात आढळले





मुंबई
➡️ 
भारतात कोरोनाच्या नव्या प्रकाराचे (New Coronavirus Strain) 6 रुग्ण आढळून आले आहेत. ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणं या रुग्णांमध्ये सापडली आहेत. एकूण 6 जणांच्या सॅम्पलपैकी 3 बेंगळुरूतील NIMHANS मध्ये, 2 हैदराबादमधील CCMB मध्ये तर एक पुण्यातील NIV मध्ये पॉझिटिव्ह आढळले आहेत.

या सर्व व्यक्तींना संबंधित राज्य सरकारांनी नियुक्त केलेल्या आरोग्य सेवा सुविधांमध्ये आयसोलेटेड खोलीमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांचा ज्यांच्याशी संपर्क आला आहे, त्यांना देखील क्वारंटाइन करण्यात आले आहे. सहप्रवासी, कुटुंबातील सदस्य आणि इतरांचे ट्रेसिंग केले जात आहे शिवाय इतर नमुन्यांवर Genome sequencing सुरू आहे. भारतामध्ये नव्या कोरोनाचा शिरकाव झाल्याने राज्यातील सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

INSACOG लॅबमध्ये टेस्टिंग आणि नमुने पाठवणे, आवश्यक नजर ठेवणे, काळजी घेणे यांसारख्या बाबींमध्ये राज्यांना वेळोवेळी सल्ला देण्यात येत आहे. या परिस्थितीत विशेष काळजी घेण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोव्हिड-19 संदर्भात योग्य खबरदारी घेण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना त्यांनी 31 जानेवारीपर्यंत लागू केल्या आहेत. नववर्ष आणि हिवाळ्याच्या हंगामात कोरोनाच्या आणखी केसेस वाढू नये याकरता केंद्राने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कठोर दक्षता पाळण्यास सांगितले आहे.

25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीत 33 हजार प्रवासी ब्रिटनहून आले

25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर 2020 ला मध्यरात्री सुमारे 33 हजार प्रवासी ब्रिटनमधून विविध भारतीय विमानतळांवर दाखल झाले. या सर्व प्रवाश्यांचा मागोवा घेण्यात आला आहे आणि राज्य किंवा केंद्र शासित प्रदेशांद्वारे आरटी-पीसीआर चाचण्या घेण्यात आल्या आहेत. आतापर्यंत फक्त 114 जणं पॉझिटिव्ह सापडले आहेत. जीनोम सिक्वेन्सींगचे हे सकारात्मक नमुने 10 INSACOG लॅब (NIBMG कोलकाता, आयएलएस भुवनेश्वर, एनआयव्ही पुणे, सीसीएस पुणे, सीडीएफडी हैदराबाद, सीडीएफडी हैदराबाद, इनामो बेंगलुरू, निमहंस बेंगलुरू, आयजीआयबी दिल्ली, एनसीडीसी दिल्ली) यांना पाठविण्यात आले.




Post a Comment

0 Comments