Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

अनैतिक संबंधातून 24 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या, 03 आरोपी अटक





भुसावळ ➡️ जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुका हत्याकांडाच्या घटनेनंतर पुन्हा एकदा हादरला आहे. रावेर तालुक्यातील सुनोदा गावात अनैतिक संबंधातून एका 24 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हत्येचा उलगडा होवू नये यासाठी मारेकऱ्यांनी तरुणाचा मृतदेह जळगाव जवळील नशिराबाद हद्दीतील रेल्वे रुळावर फेकला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवून अवघ्या काही तासांत 03 संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. 

 प्राप्त माहितीनुसार रावेर तालुक्यातील सुनोदा गावातील दीपक सपकाळे या तरुणाची घराशेजारीच राहणाऱ्या 21 वर्षीय विवाहितेशी अनैतिक संबंध होते. याची कुणकुण तिच्या पतीसह नातेवाईकांना लागली होती. त्यात विवाहितेनं दीपक सपकाळे याला तिच्या माहेरी यावल तालुक्यातील पाडळसा येथे शनिवारी (26 डिसेंबर) रोजी रात्री बोलवले होते

त्यानंतर 21 वर्षीय विवाहितेसह तिचा पती नितीन राजू धाडे व विवाहितेचा भाऊ हेमंत बाळू कोळी व अन्य एक विधिसंघर्ष बालकाच्या मदतीनं दीपक सपकाळेची हत्या करण्यात आली. नंतर त्याचा मृतदेह चारचाकी वाहनातून नशिराबादजवळील जळगाव खुर्द रेल्वे रुळावर आणून टाकण्यात आल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पोलीसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. पोलीस आरोपींची कसून चौकशी करत आहेत.




Post a Comment

0 Comments