Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

किराणा दुकानात चोरी करणाऱ्या 02 अटक, 03 आरोपीचा शोध सुरू






परभणी ➡️ जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या विशेष पथकाने गंगाखेड शहरात दुकानांचे शटर वाकवून चोरी करुन फरार झालेल्या 05 पैकी 02 चोरट्यांना मंगळवारी (दि. 29) जेरबंद केले.

गंगाखेड येथे गुरुवारी (दि. 24) रात्री 05 चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवून दुकानातील साहित्य लांबवले होते. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. विशेष पथकाचे परिविक्षाधीन पोलिस उपाधीक्षक श्री. दडस सर, फौजदार विश्वास खोले, पोलीस कर्मचारी सुग्रीव केंद्रे, राहूल चिंचाने, जमीर फारोखी, शंकर गायकवाड़, विष्णु भिसे, चालक आरूण कांबळे यांना दुकान फोडीतील आरोपी बाबत माहिती मिळाली होती. 

त्यावरून त्यांनी मोठ्या शिताफीने सुदर्शन तुळशीराम जाधव (वय 30 वर्ष रा. तुळजा भवानी नगर, गंगाखेड) व विनोद बाबुराव लोखंडे (वय 25 वर्षे, रा. इंद्रा नगर परळी जि बिड) या दोन चोरट्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून किराणा दुकानात चोरी केलेले साहित्य जप्त केले. तसेच आणखीण 03 चोरांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. ताब्यात घेतलेल्या चोरट्यांना गंगाखेड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असल्याचे विशेष पथकाने म्हटले.




Post a Comment

0 Comments