Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

ज्यानी घडवलंय त्यांचा सन्मान करण्याचा प्रयत्न करतोय- मुख्यकार्यकारी अधिकारी कुरुंदकर




 


परभणी ➡️ राष्ट्रीयकृत बँक जे काही देऊ शकते त्याहीपेक्षा वेगळे काम करण्याचा प्रयत्न जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी कर्मचारी  करत आहेत. शिक्षक समाज घडविण्याचे काम करतात आणि  शिक्षक संघटनेनी केलेल्या विविध मागणीमुळे शिक्षकांसाठी जास्त काम करण्याची संधि मिळाली. त्यामुळे ज्यांनी आम्हाला घडवलं त्या शिक्षकांचा कामातून सन्मान करण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. आर. कुरुंदकर यांनी प्रतिपादन केले. 

शहरातील जिल्ह्य मध्यवर्ती बैंकेत करण्यात आलेल्या  शिक्षकांच्या विविध मागणीला यश मिळाल्याने गोपाळराव मोरे यांच्या पुढाकाराने बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. आर. कुरुंदकर, सरव्यवस्थापक  आर.व्ही. मौजकर, शाखा व्यवस्थापक एस. आर.  कदम, सहाय्यक व्यवस्थापक सी.टी.कदम, कर्मचारी बी.एम.काळे, एच.एन. मेंडके, एन. डी. चव्हाण, एस. जी. दीक्षित ,ए. एस. पठाण, अमित पारवे ,जी .एस. ढोणे, सय्यद गफार ,अशोकराव भोसले, पुंड, थोरात आदींचा बँकेच्या सभागृहात (दि.28) रोजी सत्कार करण्यात आला.  

याप्रसंगी बोलतानां सरव्यवस्थापक  आर.व्ही. मौजकर म्हणाले कि मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांना जशी आपलीशी वाटते तशी आता शिक्षकांनाही आपलीशी वाटली पाहिजे यासाठी सर्व जण प्रयत्न करत आहोत. बँक आपली आहे आपल्यासाठीच करतोय.  बँकेच्या माध्यमातून शिक्षकांचा सन्मान  कसा होईल याकडे जास्तीत जास्त कल राहणार असल्याचेही सांगितले. यावेळी कोरोना  वारियर्स सुशीलकुमार देशमुख , शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष संतोष गायकवाड सुनील काकडे, राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष पी. आर. जाधव,प्रा.तुकाराम साठे,  आयोजक गोपाळराव मोरे, प्राचार्य प्रकाश हरगावकर, भारत कांदे , नागोराव माने ,सय्यद सगीर ,राजू दीपके आदिंची उपस्थिती होती. प्रस्ताविक संतोष गायकवाड़ यांनी केले. सूत्रसंचालन रामप्रसाद अवचार तर आभार गुलाबराव हरकळ यांनी मानले.




Post a Comment

0 Comments