Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणी जिल्ह्यात 94 कोरोनाबाधितांची भर, 03 कोरोनाबाधितांचा मृत्यू




परभणी ➡️ जिल्ह्यात 22 आॅगस्ट रोजी सायकाळी प्राप्त अहवालानुसार दिवसभरात 94 रुग्ण कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. तर 03 कोरोनाबाधितांचा मृत्यू तसेच 07 जण कोरोनामुक्त झाले आहे. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाले संख्या 94 झाली आहे. आजपर्यंत 01 हजार 975 रुग्ण पाॅझिटिव्ह निघाले आहे. आजपर्यत 786 कोरोनामुक्त झालेले आहे. आतापर्यंत एकूण 12 हजार 553 संशयितांचे स्वॅब घेतल्या गेले असून त्यातील 10 हजार 326 स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. तर 1 हजार 975 स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. 152 स्वॅब अनिर्णायक असून 60 स्वॅब तपासणीस अयोग्य ठरले आहेत. 40 स्वॅबचे अहवाल येणे बाकी आहे.
03 कोरोनाबाधितांचा मृत्यू - परभणीतील काद्राबाद प्लॉट भागातील एका 82 वर्षीय महिला, दर्गा रोड परिसरातील 52 वर्षीय पुरुष तसेच मानवत तालुक्यातील वडगाव मोड किन्होळा येथील 18 वर्षीय युवतीचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला.
94 कोरोनाबाधित रुग्णांमध्ये - परभणी शहरातील 68, परभणी ग्रामीण 03, पाथरी शहर 07, मानवत शहर 01, गंगाखेड ग्रामीण 01, सोनपेठ शहर 05, पुर्णा शहर 07 आणि पुर्णा ग्रामीण 02 असे एकूण 94 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांमध्ये 81 पुरुष आणि 13 महिलाचा समावेश आहे. विशेष म्हणजे परभणी शहरातील जिला कारागृहातील 68 आणि पाथरी पोलिस क्वार्टर मध्ये 01 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले आहे.
07 कोरोनामुक्त रुग्णामध्ये - परभणी शहर 06, परभणी ग्रामीण 01 यात 02 पुरुष आणि 05 महिलाचा समावेश आहे.




Post a Comment

0 Comments