Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणी जिल्हा कारागृहातील 23 कैद्यांना कोरोना




परभणी ➡️ परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने शनिवारी दिनांक 22 रोजी  रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्टद्वारे जिल्हा कारागृहात कैद्यांची तपासणी  करण्यात आली. 96 रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्टद्वारे तपासणी करण्यात आली, यावेळी निगेटीव्ह 73 तर पॉझीटीव्ह 23 आढळले.                                     
    महानगर पालीका आयुक्त देविदास पवर यांच्या मार्गदर्शनाखाली सहयाक आयुक्त श्रीकांत कांबळे,आरोग्य अधिकारी डॉ.कल्पना सावंत, नोडल अधिकारी अभिजीत कुलकर्णी, डॉ.ऋतुजा मगर, डॉ.ऋषीकेश चाळक,  ढोबळे, प्रयोगशाळा तज्ञ अजहर मोहम्मद जावेद, अक्षय शिंदे, सुनीन भर्दगे, मुरली समींद्रे, दत्ता शिंदे,कनले यांनी परिश्रम घेतले. महानगरपालिकेच्या वतीने शहरातील कोरोना विषयी लक्षणे दिसून येत असल्यास नागरिकांनीही महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या सेंटरवर तपासणी करण्याचे आवाहन महापौर अनिता सोनकांबळे, उपमहापौर भगवान वाघमारे,सभागृह नेते सय्यद समी उर्फ माजू लाला, स्थायी समिती सभापती गुलमीर खान, आयुक्त देविदास पवार यांनी केले आहे.




Post a Comment

0 Comments