Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/श्री शिवाजी महाविद्यालयात स्वातंत्र्यदिनी भित्तीपत्रकाचे विमोचन





परभणी - श्री शिवाजी महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाच्या वतीने स्वातंत्र्यादिनाच्या औचित्याने 'मेरी मिट्टी मेरा देश अभियान' शीर्षक असलेले डिजिटल भीतीपत्रकाचे विमोचन  मंगळवार (दि.15) रोजी  मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. (vnsnews24, feature ) 



यावेळी महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख हेमंतराव जामकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. देशाच्या रक्षणासाठी योगदान देणाऱ्या शूरवीर परमवीर चक्र प्राप्त सैनिकांच्या शौर्य गाथाची माहिती देणाऱ्या भीतीपत्रकाचे विमोचन हेमंतराव जामकर, निमंत्रित सदस्य केशवआण्णा दुधाटे, प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्य डॉ. रोहिदास नितोंडे, प्रबंधक विजय मोरे, उपप्राचार्य आप्पाराव डहाळे, पर्यवेक्षक प्रा.नारायण राऊत, एनसीसी विभागप्रमुख लेफ्टनंट डॉ.प्रशांत सराफ आदींच्या हस्ते करण्यात आले.




याप्रसंगी एनसीसी कॅडेट्सनी तयार केलेल्या भीतीपत्राचे कौतुक प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव यांनी केले. महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. भित्तीपत्रक तयार करण्यासाठी कॅडेट गजानन गडदे, निरज केदारी, गजानन पवार, दत्ता खोंडे, विठ्ठल सोनार, अमोल कचवे, शिवम बेद्रे आदींनी परिश्रम घेतले.






Post a Comment

0 Comments