Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/  सुयोग इंग्लिश स्कुल मध्ये स्वांतत्र्य दिन उत्‍साहात साजरा





परभणीशांतीनगर, येथील सुयोग इंग्लिश स्कुलमध्ये स्वांतत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला, याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ सुनील चिलगर,  सुप्रसिध्द नेत्ररोगतज्ञ चिलगर हॉस्पीटल, परभणी याच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतीमेच पुजन करून ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्याना डोळयांची कशी काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन करून सर्व विद्यार्थी पालक व कर्मचाऱ्याची डोळे तपासणी केली. (vnsnews24, feature ) 




याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ ज्ञानोबा मुंढे, प्राचार्य डॉ. विठ्ठल घुले, राजर्षी शाहु महाराज महाविद्यालय, परभणी, लॉयन्स क्लबचे अध्यक्ष रोहित गरजे, कोषाध्यक्ष मयुर भाले, कॅबीनेट ऑफिसर संतोष नारवानी, आणि सुयोग इंगिलश स्कुलचे प्राचार्य सिध्दार्थ गवई उपस्थित होते. 




कार्यक्रमादरम्यान विदृयार्थानी आपल्या कलागुणाच्या माध्यमातुन उपस्थिताना मंत्रमुग्ध केले. त्याचबरोबर देशभक्तीपर गीतांवर बहारदार समुह नृत्य सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. विद्यार्थ्याच्या एका चमुने जोरदार लेझीम नृत्य सादर केले. लहान चमुकल्यांनी थोर पुरूषांच्या वेशभुषेत येऊन एकात्मतेचे संदेश दिला त्याचबरोबर उपस्थिताना महापुरूषांच्या सानिध्यात असल्याचा क्षण अनुभवयास दिला, या प्रसंगी उपस्थितानी त्यांच कौतुक केले.     



अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ ज्ञानोबा मुंढे यांनी स्वांतत्र्य वीरांना स्मरून त्यांच्या कार्याविषयी आणि देशभक्तीबद्दल माहीती दिली. त्याचबरोबर आपल्या देशांला स्वांतत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्य वीरांच्या प्राणांच्या आहुतीनंतर इंग्रजांच्या गुलामगिरीतुन मुक्त झालेल्या भारतमाताने मुक्त श्वास घेतला.




त्यामुळेच अनेक स्वातंत्र्यवीरांना स्मरून हा दिवस देशभरात आनंदाने साजरा केला जातो असे प्रतिपादन केले. त्याचबरोबर लॉयन्स क्लबचे सामाजिक कार्य आणि त्यांच्या उपलब्ध असलेल्या विविध सेवेची माहीती उपस्थिताना दिली. 





कार्यक्रमांचे सुत्रसंचालन अमीन मुजावर यांनी तर आभार रत्नदिप वेडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नारायण सुर्यवंशी,  सुचिता थोरवटे, अंजली झरकर, सत्यजीत मोकाशी, मनोज कुलकर्णी, साीमा ताकतोडे, करूणा सोनवणे, शुभम पाठक, हिराबाई बोरकर आदींनी प्रयत्न केले.






Post a Comment

0 Comments