Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/विद्यापीठीय जलतरण स्पर्धेत ज्ञानोपासक महाविद्यालय प्रथम




 जलतरण स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे  अभिनंदन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ श्रीधर भोंबे, उपप्राचार्य एम एस दाभाडे, मार्गदर्शक  प्रा नारायण शिंदे.

जिंतूर - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि राजश्री शाहू महाविद्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्विमिंग पूल लातूर येथे आयोजित जलतरण स्पर्धेत  ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. (vnsnews24, feature ) 




वरिष्ठ महाविद्यालयातील बी.ए. प्रथम वर्षात शिक्षण घेणारा विद्यार्थी सुनील गोविंद गहिरे याने 100 मीटर व 200 मीटर बॅक स्ट्रोक मध्ये प्रथम क्रमांक तर 50 मीटर बॅक स्ट्रोक मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला .तसेच बी ए प्रथम वर्षात शिक्षण घेणारा विद्यार्थी बेग तालेब रहीम यानेही 200 मीटर फ्रीस्टाइल मध्ये द्वितीय, 400 मीटर फ्रीस्टाइल मध्ये द्वितीय तर 50 मीटर फ्रीस्टाइल मध्ये तृतीय क्रमांक पटकावला. 





हे दोन्ही विद्यार्थी येलदरी येथील रहिवासी असून त्यांनी प्रा. नारायण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली येलदरी येथील जलाशयात विविध प्रकारच्या जलतरणाचा कसून सराव केला होता. त्यांच्या या यशाबद्दल ज्ञानोपासक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा माजी खासदार ॲड.गणेशराव दुधगावकर, सचिव डॉ.संध्याताई दुधगावकर, सहसचिव समीर भाऊ दुधगावकर, प्राचार्य डॉ. श्रीधर भोंबे, उपप्राचार्य एम.एस. दाभाडे ,क्रीडा शिक्षक प्रा. नारायण शिंदे, रास रासेयोचे समन्वयक प्रा डॉ पंढरीनाथ धोंडगे प्रा डॉ निवृत्ती पोपतवार, प्रा. एस. पी. कदम यांच्यासह सर्व प्राध्यापकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.






Post a Comment

0 Comments