पुर्णा ➡️ तालुक्यातील कानखेड येथील ५७ वर्षाच्या इसमाचा आंब्याच्या झाडावरून खाली पडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.१७) सकाळी १० ते ११ एकरुखा शिवारात घडली. (vnsnews24, feature )
मयत हा शेत गट क्रमांक २८ मध्ये सत्यनारायण मुंदडा यांच्या आखाड्यावर सालगडी म्हणून काम करत होता. या घटनेची माहिती मिळताच ताडकळस पोलीस ठाण्याचे पोलिस कर्मचारी दिपक बेंडे, मारोती कुडगीर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ताडकळस प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविला डॉ.वैभव कांबळे शव विच्छेदन केले.
एकरुखा शिवारातील गट क्रमांक २८ मधील झाडावर मयत बाबुराव दामाजी कदम हा आंबे काढण्यासाठी गेला होता. त्यावेळी वा-याच्या झोकाने तोल जाऊन जमिनीवर खाली पडून डोक्यात मार लागून तो मरण पावला असल्याची माहिती मयताचा भाऊ सिताराम दामाजी कदम यांनी रविवारी ताडकळस पोलीस ठाण्यात दिली.
त्यावरुन अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास ताडकळसचे ठाणेदार कपिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार दिपक बेंडे, संभाजी शिंदे हे करीत आहेत.
0 Comments