जिंतूर ➡️ तालुक्यातील सावंगी (म्हाळसा) येथील आदर्श जिल्हा परिषद शाळेत आज 15 जून रोजी शैक्षणिक वर्ष 2023-24 हे शैक्षणिक वर्ष सुरु झाले आहे. (vnsnews24, feature )
उन्हाळी सुट्टया नंतर शाळा सुरु झाले असून आज शाळा सुरु होत असल्याने या जि.प. शाळेत इयत्ता पहिलीत आपला प्रवेश घेणारे विद्यार्थ्यी वर्ग व पालक वर्ग यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
आज इयत्ता पहिलीत आपला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमातील पुस्तके वाटप करून शालेय पोषण आहार देण्यात आला. तसेच सावंगी (म्हाळसा) येथील जि.प. शाळेत आपला पहिल्या इयत्तेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची ची प्रभातफेरी काढण्यात आली. या वेळेस शाळेचे मुख्याध्यापक पीपी चव्हाण सहित पालक वर्ग व मान्यवर उपस्थित होते. इयत्ता पहिलीत आपला प्रवेश होत असल्याने त्यांच्यात मोठा उत्साह दिसून येत होता.
0 Comments