Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ ८१२ रुग्णांनी घेतला मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराचा लाभ




                                      

जिंतूर ➡️ अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाच्या स्थापना दिनानिमित्त  धन्वंतरी आयुर्वेद शिक्षण संशोधन संस्था धुळे व महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन जिल्हा शाखा परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराचे आयोजन दिगंबर जैन अतिशय क्षेत्र नेमगिरी संस्थान यांच्या वतीने करण्यात आले होते या शिबिरात सर्व ८१२ ज् रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.(vnsnews24, feature ) 




आचार्य १०८ विद्यासागरजी महाराज यांच्या आशीर्वादाने व परमपूज्य मुनी श्री  सौम्यसागरजी महाराज ससंघ यांच्या मंगल सानिध्याने जिंतूर येथील श्री दिगंबर जैन अतिशय क्षेत्र निमगिरी संस्थान जिंतूर येथे 27 ते 28 मे पर्यंत दोन दिवसीय मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराचे आयोजन सकाळी ८ ते ११ व संध्याकाळी ५ ते ८  या वेळेत करण्यात आले होते. 




या शिबिरात नाडीद्वारे तपासणी करून वातव्याधी, रक्तदाब, मधुमेह, अस्थिरोग, मर्म, पांचभौतिक, स्त्रीरोग , अग्नी व विद्यकर्म आणि पंचकर्म द्वारे  रुग्णांची चिकित्सा करण्यात आली. 




आरोग्य तपासणी करिता मुंबई येथून डॉ. सुभाष शहा व डॉ. मोनिका शहा, महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनाचे जिल्हाध्यक्ष डॉ.शिवप्रसाद सानप व डॉ.बाळासाहेब घुगे  व धन्वंतरी आयुर्वेद शिक्षण संशोधन संस्था धुळे येथील डॉ. प्राची कांडपाल, डॉ. पूजा गीते काकड , डॉ. धनंजय गीते, डॉ. केतन सालधर, डॉ. अजय कुमार शर्मा, डॉ.पवनदीप मुटणेजा, डॉ. तरनदीप गर्ग या सर्व डॉक्टरांनी रुग्णांची मोफत तपासणी करून चिकित्सा केली.




या शिबिराचे आयोजन श्री दिगंबर जैन अतिशय क्षेत्र निमगिरी संस्थान यांच्यावतीने करण्यात आले होते. हे शिबिर यशस्वी करण्याकरिता पत्रकार सचिन रायपत्रीवार व समस्त दिगंबर जैन समाज बांधव जिंतूर यांनी अथक परिश्रम घेतले.






Post a Comment

0 Comments