Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ एच. ए. आर. सी. संस्था परभणी आयोजित "शिवम बाल संस्कार शिबिर 2023" ला मुलांचा उत्तम प्रतिसाद




परभणी ➡️ इंद्रजीत देशमुख काकाजींच्या विचारातून जन्माला आलेल्या बालसंस्कार शिबिर संकल्पनेला आत्मसात करत एच. ए. आर. सी. संस्थावतीने 24 आणि 27 मे रोजी "शिवम बाल संस्कार शिबिर 2023" चे आयोजन करण्यात आले होते. (vnsnews24, feature )  



उद्याच्या भारताला बलशाली बनवण्यासाठी बलशाली तरुण घडले पाहिजेत आणि याची सुरुवात लहानपणापासून पासून व्हायला हवी. या आदरणीय इंद्रजीत देशमुख काकाजींच्या विचारातून जन्माला आलेल्या बालसंस्कार शिबिर संकल्पनेला आत्मसात करत एच. ए. आर. सी. संस्था परभणी यांनी गेल्या वर्षीपासून सुरू केलेल्या या उपक्रमाला याही वर्षी पालकांचा आणि मुलांचा अगदी भरभरून प्रतिसाद मिळाला.




२४/०५/२०२३ पासून सुरू झालेल्या या शिबिरात अनेक वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले. ग्रंथदिंडी, कागदकाम, कागदीटोपी, मातीकाम, बोलक्या बाहुल्या, संभाषण कौशल्य,अभिनय कौशल्य, आंतरराष्ट्रीय ख्यातिचे बालसाहित्यिक गणेश आयथळ यांची मुलाखत, निसर्ग ओळख, संतांच्या देखाव्यातून महाराष्ट्रातील थोर संतांची ओळख इ.  




आज २७/०५/२०२३ शिबीराच्या चौथ्या दिवशी भाजी भाकरी महोत्सव हा उपक्रम राबविण्यात आला. पिझ्झा बर्गर या पाश्चिमात्य खाद्य संस्कृतीमुळे आपल्या पोषक खाद्य संस्कृतीतून विलुप्त होत चाललेल्या भाकरीला पुढच्या पिढ्या न पिढ्या जिवंत ठेवण्यासाठी,एकल असणाऱ्या चिमुकल्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. बालकांच्या इवल्याशा हातांनी भाकरीला आकार देत हा उपक्रम अगदी उत्साहात पार पडला. त्यांचं भविष्य भाकरी सारखं पोषक आणि गोलाकार होण्यासाठी हा एक मायेचा संस्कार त्यांच्या मनावर कोरण्यात आल्या. मुलांनी सुध्दा भाकरी शिकण्याचा प्रयत्न करत या उपक्रमातून अगदी मनसोक्त आनंद लुटला.

 





बऱ्याच वेळा आई वडील बाहेरगावी जातात किंवा ग्रामीण भागातील पालक ऊसतोडी साठी बाहेरगावी जातात त्यामुळे विद्यार्थ्यांची शाळा बुडते, त्यामुळे मुलांना सुद्धा स्वतः आपल्या हाताने भाकरी बनवता यावी जेणेकरून मुले स्वावलंबी होतील यासाठी भाजी भाकरी हा उपक्रम महत्वाचा आहे. 


या उपक्रमात वंचित घटकातील बालके - माझं घर प्रकल्प बुधोडा ता औसा जि लातूर येथील 40 मुले, इंफॅन्ट इंडिया प्रकल्प बीड येथील 10 मुले, सेतू संस्थेतील 11 वंचित बालके आणि सक्षम पालकांची 60 मुले असे ऐकून 120 मुलांनी शिबिरात सहभाग नोंदवला. 





या उपक्रमाच्या यशस्वीततेसाठी होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज या संस्थेचे प्रा शिवा आयथळ, डॉ. पवन  सत्यनारायण चांडक ,  आकाश कदम, डॉ. आशा चांडक, संगीता भावसार, राज गोंधळी, अजिक्य वास्कर,  दिग्विजय वासकर, सौ संध्या मिसाळ, शरद लोहट, अर्जुन पवार, डॉ. महेश अवचट, शरद झरे,  एड.चंद्रकांत राजुरे, माहुरकर, सोनवणे, उल्हास खंबायतकर, वासलवार  यांनी केले आहे.





Post a Comment

0 Comments