Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/  आ. डॉ.राहुल पाटील हस्ते शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन, कोट्यवधींचा निधी मंजूर





परभणी ➡️ शहरातील प्रभाग १५ व ०४ मधील अनेक रस्ते व नाली बांधकाम करण्याची नागरिकांची मागणी होती. नागरिकांच्या या मागणीची दखल घेत शासनाकडून या दोन्ही प्रभागातील रस्ते व नाली विकास कामांसाठी कोट्यवधी रूपयांचा निधी शासनाकडे पाठपुरावा करून आणला आहे. यापुढेही शहरातील कोणत्याही प्रभागात विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन आमदार डॉ.राहूल पाटील यांनी रविवारी केले आहे. (vnsnews-24, political, parbhani ) 




परभणी शहरातील प्रभाग क्रमांक १५ व ४ मधील मातोश्री नगर, सिद्धिविनायक नगर, माऊली नगर, अहिल्यादेवी होळकर नगर, शिवाजीनगर येथे मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा आ.डॉ. पाटील यांच्या हस्ते रविवारी पार पडला.




  • सोयी सुविधा विकास योजनांतर्गत विश्वकर्मा मंदिर परिसरातील रस्त्यासाठी ३५ लाख ७४ हजार रुपये.
  • सिद्धिविनायक नगर येथे रस्ता व नाली बांधकामासाठी २५ लाख ५५ हजार रुपये.
  •  मातोश्री नगर येथे २९ लाख ८७ हजार रुपये.
  • अहिल्यादेवी होळकर नगर, एमआयडीसी परिसर येथे रस्ता व नाली बांधकामासाठी १७ लाख रुपये.
  • शिवाजीनगर येथे डॉ.जेथलिया ते काळवीट यांच्या घरा पर्यंतचा रस्ता कामासाठी १३ लाख ३५ हजार रुपये.
  • जिजाऊ नगर येथे ४२ लाख ६३ हजार रुपये.
  • रामकृष्ण नगर येथे जनकल्याण नागरी सहकारी बँक ते रेल्वे ट्रॅक पर्यंत नाली बांधकामासाठी ४२ लाख ५१ हजार रुपये.
  • दाते किराणा ते संत सावता नगर पाटी पर्यंत रस्ता बांधकामासाठी २० लाख ५५ हजार रुपये.



या विविध विकास कामांच्या भुमिपूजन प्रसंगी राहूल खटींग,मारोती तिथे, पांडुरंग देशमुख, दिलीप गिराम, बाळासाहेब गोडबोले, नंदीनी पानपट्टे, गोपाळ कदम, फैजुल्ला पठाण, कारेगावचे सरपंच वावरे, उपसरपंच शिव आवचार, ज्ञानेश्वर गिरी, दिलीप ताडकळसकर, दिनेश नरवाडकर, विनय मोहरीर, ऋषी सावंत, हिप्पळगावकर, गजानन लोंढे, बाळू झांजरी, ज्ञानेश्वर जोगदंड, अमित हराळ, सतिश सातोनकर, सुरेश छत्रपती, कमुटाला, पेडगावकर, विजय चौधरी, बाळू शेटे, सतिश ढवळे, छोटू चौधरी, बाळू शेटे, बोरीकर, मगर, विजय डावरे, चव्हाण, बाबुराव गमे यांच्यासह नागरीकांची उपस्थिती होती.







Post a Comment

0 Comments