Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/चारठाणा पोलिसांच्या कारवाईत गुटख्यासह ९ लाखांचा मुद्देमाल जप्त ; एका जणांविरुद्ध गुन्हा दाखल






जिंतूर ➡️ तालुक्यातील चारठाणा पोलीस स्टेशनचे पोलिसांनी देवगावहून  चारठाणा मार्ग जिंतूरकडे जात असलेल्या मारोती सुपर वाहनातून गुटखा व वाहन असा एकुण ९ लाख ७ हजार ४४० रुपायांचा ऐवज जप्त करून एका विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कार्यवाही शनिवारी (दि. १८) रात्री साडेआठच्या सुमारास करण्यात आली. (vnsnews-24, feature, parbhani ) 





देवगाव फाटा ते  चारठाणा रस्त्यावरून  जिंतूरकडे  (एम.एच.२२ ए.एन.३९३२) या क्रमाकाच्या पांढर्‍या रंगाच्या मारोती सुपर वाहनातून गुटका जात असल्याची कुणकुण  चारठाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड यांना लागली असता त्यांनी चारठाणा पुलाजवळ हे वाहन  थांबविले व वाहनांची झडती घेतली.   




वाहनातून शासनाने बंदी घातलेला व आरोग्यास घातक असलेला गुटका घेऊन जात असताना सचिन कैलास शर्मा (रा.जिंतूर) हा रंगेहाथ आढळून अाला.  वाहनात गोवा,राजनिवास व सुगंधीत पान मसाला,विमल पानमसाला, सुंगधीत तंबाखु असा एकुण ५ लाख ४ हजार  ४४० हजार रुपायांचा गुटखा व १०  हजार रुपये किंमतीचा  मोबाईल व ४ लाख २० हजार रूपये  किमतीचे वाहन असा एकुण ९ लाख ७ हजार ४४० रुपायांचा ऐवज चारठाणा पोलिसांनी जप्त केला आहे.





दरम्यान ही कार्यवाही सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड,  उपनिरीक्षक विनोद साने, पोलीस नाईक विष्णूदास गरूड, पो.काॅ. रविराज वानरे, पवन राऊत यांनी केली. दरम्यान, पोलीस नाईक विष्णूदास गरूड यांच्या फिर्यादीवरून सचिन कैलास शर्मा (रा.जिंतूर) यांच्याविरुद्ध  चारठाणा पोलीस ठाण्यात गुरन ४६ / २०२३ कलम ३२८, २७२, २७३, १८८ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा  तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद साने हे करीत आहेत.







Post a Comment

0 Comments