Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/  परभणीत शिक्षकसेनेचे ढोल बजावो आंदोलन





परभणी ➡️ परभणी तालुका शिक्षकसेनेच्या वतीने जुनी पेन्शन देण्यात यावी, या मागणीसाठी आज शनिवारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर ढोल वाजवत व घोषणा देत सरकारला जाग आणण्यासाठी तालुकाध्यक्ष गुलाबराव हरकळ, शहराध्यक्ष प्रकाश हारगावकर यांच्या नेतृत्वाखाली ढोल बजावो आंदोलन करण्यात आले. (vnsnews-24, education, parbhani ) 

 



शहरातील नेहरु रोडवरील महात्मा ज्योतीबा फुले यांना अभिवादन करून शिक्षकसेनेच्या पदाधिकार्‍यांनी ढोल वाजत घोषणा देत जिल्हा परिषदेच्या मैदानात संपकरी आंदोलनकांना भेट देऊन पाठींबा दर्शवित ढोल वाजवत ‘एकच मिशन जुनी पेन्शन, पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, पेन्शन द्या नाहीतर खुर्च्या खाली करा’ अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.  संपात सहभागी न झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर  कर्मचार्‍यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. 



या आंदोलनास प्रमुख म्हणून शिक्षकसेनेचे राज्यसचिव तथा मराठवाडा सरचिटणीस बाळासाहेब राखे यांच्यासह शिक्षकसेनेचे जिल्हा सरचिटणीस दिगांबर मोरे उपस्थित होते. याप्रसंगी तालुकाध्यक्ष गुलाब हारकळ, शहराध्यक्ष प्रकाश हारगावकर,  माणिक कदम, मनोहर चौधरी, पी.एम. चव्हाण, अभिजित ठाकूर, बालाजी आंमले, सूरजसिंह राठोड, चापके, प्रा. विठ्ठलराव लटपटे, महाराष्ट्र आश्रम शाळा संघटना जिल्हा सचिव पंकज मंदोडे, अमोल क्षीरसागर, सुरेश आलट, मोहन आलट, गोविंद सोळंके, माणिक कदम, कुंडलिक खेडकर, राम सोनवणे, नागरे, सुरेश पैठणे, रबदडे नरहरी, गजानन घाटुळे, रोहित गाडगे, गौतम गायकवाड, रमेश लिपणे, मधुकर आवरगंड, राम भोसले, भगवान सोळंके, गोपाळ गोरे, सतीश जांभळे, विनायक गोरे,  लक्ष्मण कदम, संदीप सावंत, हरिपंडित तिडके आदींसह मोठ्या संख्येने शिक्षकांची उपस्थिती होती.







Post a Comment

0 Comments