Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

आर आर आबा सुंदर गाव स्पर्धेत तालुका व जिल्हा स्तरातुन पडेगाव ग्रामपंचायतीचा प्रथम क्रमांक




1.संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशनने सुरु केलेल्या माझं गाव माझं तीर्थ अभियानातुन गाव बनले सुंदर.

2.कोरोना संकटाचे केलेले संधीत रुपांतर.

3.श्यामसुंदर निरस यांनी घेतला होता पुढाकार.

4.ओमप्रकाश यादव (उपमुख्य कार्यकारी अधिकारी परभणी) यांनी यासाठी केले होते मार्गदर्शन.

5.फाउंडेशनने सुरु केलेले हे अभियान अनेक गावात सुरु आहे.

परभणी ➡️ गाव करी ते राव काय करी? या म्हणीला सार्थ ठरवीत  संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशन अंतर्गत माझं गाव माझं तीर्थ अभियानातुन श्यामसुंदर निरस यांच्या संकल्पक पुढाकारातुन गावाची एकत्र मुठ बांधली व कोरोना काळात संकल्प स्वराज्य फाउंडेशनच्या सदस्यांनी व  पडेगावातील समस्थ ग्रामस्थांनी बालघाटच्या डोंगररांगेतील गावात  सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांच्या भक्कम मार्गदर्शनाखाली  माझं गाव माझं तीर्थ हे अभियान सुरु केले. अन गावाचा कायापालट झाला.






आर आर आबा सुंदर गाव स्पर्धेत तालुका व जिल्हा स्तरातुन गंगाखेड तालुक्यातील पडेगाव ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला आहे.




ग्रामपंचायतीने विविध योजनांचा ब अशा बक्षिसाच्या निधीचा योग्य तो समन्वय साधुन गावाचा समर्पक विकास साधावा.

रश्मी खांडेकर

मुख्य कार्यकारी अधिकारी परभणी.




लोकसहभागातुन पंचदानाच्या माध्यमातुन पडेगावकरांनी वृक्षलागवड,सार्वजनिक शौचालये,स्वच्छता यामध्ये उल्लेखणीय काम केले आहे. याचा आदर्श इतर गावांनी घेऊन गावाला स्मार्ट बनवावे.

ओमप्रकाश यादव

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा).



.



गावात राबविण्यात आलेले विशेष उपक्रम

१)हागनदारीयुक्त गाव हागणदारी मुक्त झाले.८ सार्वजनिक शौचालये उभारली.

२)कचर्‍याचे व्यवस्थापन केले

३)गावाच्या खडकाळ जमिनीत दोन हजार झाडांचे संवर्धन केले.

४)स्मशानभुमित बाकड्यांची सुव्यवस्था केली.

५)तळ्यात पाइपलाईनद्वारे पाणी व्यवस्था करुन गाव दुष्काळमुक्त केले.

६) निराधार महिलांना उदरनिर्वाहाचे साधने देऊन स्वावलंबी बनवले.

७)विविध योजनांची जनजागृती घडुन आली.


यासाठी परभणी जिल्यातील अनेक दातृत्व असणार्‍या दात्यांचा व गावातील आबाल वृद्ध तरुन सगळ्यांचा वाटा आहे.तरुन मित्रांच्या घामाचे मोल आहे.पडेगावचे सरपंच गंगासागर बोबडे,ग्रामविकास अधिकारी उद्धव खुपसे यांनीही अभियानाबरोबर योग्य तो समन्वय साधला म्हणुन गावाला स्वर्ग तयार करता आले. आर आर आबा सुंदर गाव स्पर्धेत पडेगावाला तालुकास्तरावरील १० लाख व जिल्हा स्तरावरील २० लाख अशी एकुन ३० लाख रुपयाची बक्षिसे प्राप्त झाली आहेत. त्यातुन नक्किच गावाचा विकास होईल.तो घडवुन आण्यासाठी गावातील सुज्ञ तरुन कठिबद्ध राहतील.










Post a Comment

0 Comments