जिंतूर ➡️ शहरातील मौलाना आजाद कालुनी परिसरातील रहिवासी रईसखा फैज मोहम्मद खान पठाण यांची मुलगी रफिया (वय १०) व सलिहा (वय 08) या दोन्ही चिमुकल्यांनी पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केला. (vnsnews-24, feature, jintur )
पवित्र रमजान महिन्यातील रोजेला खूप महत्त्व आहे या महिन्यात मुस्लिम समाज बांधव सलग 30 दिवस रोजे ठेवून तसेच विविध धार्मिक विधीद्वारे अल्लाह ची संपूर्ण निष्ठेने आराधना नमाज पठण करतात या दोन्ही मुलींनी आपल्या जीवनातील रोजाची सुरुवात केली.
याच मुकल्याने उन्हाची परवा न करता आपला रोजा पूर्ण केला म्हणून त्यांचे आजी मैमुन्नीसा बेगम फैज मोहम्मद (नगरसेवक) वडील रईस खान काका टीका खान, रियाज खान उर्फ बाबा, बासू खान, मोहसीन खान, सिराज सिद्दिकी आदींनी कौतुक व अभिनंदन केले आहे.
0 Comments