Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/एचएआरसी संस्थेच्या पुढाकारातून मिळणार माझं घर प्रकल्पास निवारा






परभणी ➡️ एचएआरसी संस्था, परभणी यांच्या पुढाकारातून 'माझं घर' या प्रकल्पासाठी लातूर जिल्ह्यातील वांगजेवाडी ता औसा येथे निवारा गृह उभारण्यात येत आहे.  या कामाला गती आली असून लवकरच हे काम पूर्ण होणार आहे, यासाठी परभणी जिल्ह्यातील दात्यांनी चार लाख रुपयांची मदत केली आहे. (vnsnews-24, feature, parbhani ) 





होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज ही संस्था 2010 पासून समाजातील वंचित, अनाथ, दुर्धर आजारग्रस्त बालके व निराधार महिलांच्या शिक्षण, आरोग्य व पुनर्वसन सोबत स्वयंरोजगार व प्रशिक्षण साठी कार्यरत असून आजवर त्यांना सर्वतोपरी लोकसहभागातून मदत केली आहे. 




शरद झरे व संगीता झरे  यांच्या 'माझं घर' प्रकल्पाच्या माध्यमातून जून 2021 पासून शिक्षणापासून वंचित मुलांसाठी, शाळाबाह्य व एकल पालक मुलांसाठी निवासी शाळेच्या माध्यमातून त्यांचे शिक्षण व पुनर्वसनासाठी वाणटाकळी तांडा व काटगाव तांडा येथे उभारलेल्या प्रकल्पातून प्रयत्न करत असून आजवर विविध शैक्षणिक प्रयोगातून त्यांनी त्या मुलांची शैक्षणिक प्रगती साधून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. 





एचएआरसी संस्थेने जून 2021 पासून या बालकांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून त्यांना शिक्षण व पुनर्वसनासाठी वेळोवेळी गरजेनुसार सर्वतोपरी मदत केली आहे. नुकतीच त्याना वांगजेवाडी ता.औसा जि. लातूर येथे  1/- भाडेतत्त्वावर जमीन मिळाली असून तिथे 100 वंचित मुलांसाठी निवासी शेलटर अर्थात निवारा केंद्र उभारायचे आहे. ज्याचे क्षेत्रफळ 40 x 100 अर्थात 4000 square feet इतके असणार आहे. त्यासाठी टिन, अँगल, लोखंडी पाईप, सिमेंट विटा आदी बांधकाम करून 4 हजार square feet चा बहुउद्देशीय निवारा गृह उभा राहील जिथे या मुलांची निवारा ची सोय सोबत शिक्षणाचे धडे देता येईल.




या कार्यासाठी अंदाजे साडे चार ते पाच लाख खर्च अपेक्षित आहे.  यासाठी होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज या संस्थेने सोशल मीडियावर मदतीचे आवाहन केले होते. ज्यास दात्यांच्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. मार्च महिन्यात या निवारा गृहाचा शुभारंभ होणे अपेक्षित आहे. या निवारा गृहात किमान १०० मुलं राहतील आशी व्यवस्था केली जाणार आहे. 




माझं घर चे प्रमुख शरद झरे या प्रसंगी बोलताना म्हणाले की," डॉ. लीना बगाडीया मँडम तसेच एचएआरसीचे प्रमुख डॉ. पवन चांडक यांच्या पुढाकारामुळेच आमच्या निवारा गृहाचे काम जलद मार्गी लागले आहे. आजावर एचएआरसी संस्थे तर्फे चार लाख रुपयांची मदत झाली असून यातून टिन शेड साठीचे सर्व साहित्य यातून मिळाले आहे.  या निवारा गृहामुळे १०० बालकांच्या निवासाचा प्रश्न सुटणार आहे. मुलांचे निवास, शिक्षण तसेच बहुऊदेशीय सभागृह असाही उपयोग होणार आहे. या कामी सहकार्य केल्याबद्दल डॉ. लीना बगाडीया, डॉ. पवन चांडक, प्रकाशवाटा ग्रुपवरील सर्व दात्यांचे माणूस या संस्थेच्या वतीने शरद झरे यांनी आभार मानले."




या प्रसंगी डॉ. पवन चांडक म्हणाले "शिक्षणापासून वंचित 100 बालकांसाठी हक्काचे घर व्हावे ही प्रा शिवा आयथळ सरांची इच्छा होती. म्हणून केलेल्या आवाहनास एचएआरसी संस्थेचे सदस्य व दाते यांनी दिलेल्या मदतीबद्दल आभारी आहे. विशेषतः मुंबई येथील डॉ लीना बगाडीया,  प्रा दिलीप राके, प्रा शिवा आयथळ, सत्यंजय हर्षे, शैलेश वट्टमवार, रवी मौर्य, सचिन त्यागी, मल्हार कुलकर्णी,वासुदेवानंद प्रभू, मीनल मोहन, गणेश आहेर, मुकुंद कुलथे आदी दात्यांचे मोलाचे सहकार्य लाभले".



या एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक, डॉ. आशा चांडक, माझं घर चे शरद व संगीता झरे, जयक्रांती कॉलेज चे प्राचार्य श्रीधर कोल्हे, प्रा.डॉ.केशव आलगुले, पुरुषोत्तम काळदाते, अर्जुन पवार, विवेकानंद चामले, लक्ष्मणराव वंगे,गणपतराव पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.






Post a Comment

0 Comments