Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ परभणी जिल्हातील दोन अपघात दोन जणांचा मृत्यू





असोला पाटीजवळ बसच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार तर टिप्परने सिंगणापूर फाट्याजवळ एकाला उडविले 

परभणी ➡️ परभणी ते वसमत रस्त्यावरील असोला पाटीजवळ गुरूवारी दुचाकी व एसटी बसची समोरासमोर धडक होऊन एक तरुणाचा आणि परभणी ते गंगाखेड या महामार्गावर सिंगणापूर फाट्यावर शुक्रवारी टिप्परने पादचार्‍याचा उडविले. या संदर्भात संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. 





यात पहिला अपघात हा परभणी ते वसमत रस्त्यावरील असोला पाटीजवळ घडला. यात दुचाकी व एसटी बसची समोरासमोर धडक होऊन 23 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी (दि.23)  रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली. मयत युवक हा वसमत तालुक्यातील ढवळगाव येथील रहिवासी होता.





यात मयत सतोष गणेशराव शिंदे (वय 23, रा.ढवळगाव ता.वसमत जि.हिंगोली) हा (एम.एच.- 22 - डब्ल्यू 8046) या दुचाकीवरून वसमत तालुक्यातील ढवळगाव येथे जात होता. तर हिंगोलीवरुन सोलापूरकडे जाणारी एसटी परभणीकडे येत होती. बस (एम.एच 20 डी.एल.3815) ही बस असोला पाटीजवळ आली असता दुचाकीची व एसटी बसची समोरासमोर जोराची धडक झाली. 





या घटनेची माहिती मिळताच ताडकळस पोलीस ठाण्याचे ठाणेदार कपील शेळके, जमादार लक्ष्मण कांगणे यांनी घटनास्थळी धाव घेतली व उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. दुचाकीस्वार संतोष गणेशराव शिंदे हा बसच्या धडकेत जागीच ठार झाला. या प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.







दुसरा अपघातात गंगाखेड रोडवरील सिंगणापूर फाट्यावर एका भरधाव हायवा टिपरने शुक्रवारी (२४ फेबुवारी) दुपारी वारा वाजेच्या सुमारास पादचार्‍यास धडक दिली. या अपघातात सदर अज्ञात व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळतात घटनास्थळी दैठणा पोलिस ठाण्याचे पथक दाखल झाले असून मयतास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.





प्राप्त माहितीनुसार हायवा टिप्पर (एम.एच -14 - डी.एम - 5523 ) हा डस्ट घेवून परभणीकडे भरधाव वेगाने निघाला होता. त्यावेळी या टिप्परने एका पादचार्‍यास जोरदार धडक दिली. त्यात तो जागीच ठार झाला. त्या व्यक्तीची ओळख पटली नाही. परंतु, अपघातानंतर टिप्पर चालकाने घटनास्थळावरुन पोबारा केला. दरम्यान, दैठणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व टिप्पर जप्त केला. त्या मयत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरु केले.






Post a Comment

0 Comments