Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/मध्य रेल्वे होकार दिल्यास नांदेड-पुणे दरम्यान नवीन रेल्वे-आर. के. मीणा





परभणी ➡️ एल.एच.बी रॅक लावण्याचा नावाखाली नियमित चालणाऱ्या पुणे आणि मुंबईकडे जाणाऱ्या रेलवेगाडयातील कोचेस कमी केल्याने पुण्याला जाणाऱ्या प्रवाश्यांना नो रूम म्हणजे तिकीटच उपलब्ध होत नसल्याची बाब मराठवाडा प्रवासी महासंघाने निदेर्शनास आणून दिल्यानंतर मध्य रेल्वे होकार दिल्यास पुणे येथे जाण्यासाठी नांदेड येथून आणखी एक नवीन रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयन्त करणार असल्याचे आश्वासन अतिरिक्त रेलवे महाप्रबंधक राजेश कुमार मीणा यांनी काल दिले आहे.




काल दिनांक 23 फेब्रुवारी रोजी नांदेड येथे मराठवाडा प्रवासी महासंघाचे अरुण मेघराज, प्राचार्य सुरेश नाईकवाडे, कदर लाला हाश्मी, किरण चिद्रवार यांनी दमरे रेल्वे विभागीय कार्यालयातील विविध अधिकाऱ्याचा भेटी घेऊन रेलवच्या विविध समस्या मांडल्या. त्यात सध्याच्या परिस्थितीत पुण्याला दररोज धावणार्या ४ ते ५ गाड्यांची गरज आहे. 





फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळी सिझन सुरू होण्या पूर्वीच पुण्यासाठी वेटिंग चा पलीकडे "नो रूम" म्हणजे टिकटच उपलब्ध नाही. या बाबत नांदेड विभागाचे अधिकार्यांच्या लक्षात आणून नांदेड-पनवेल, नादेड-पुणे आणि राज्यराणी एक्सप्रेस मध्ये प्रत्येकी पाच अतिरिक्त स्लीपर कोच जोडण्याची मागणी घेऊन दिनांक 23 फेब्रुवारी रोजी मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाचे एका शिष्टमंडळाने विभागीय अतिरिक्त महाप्रबंधक राजेंद्र कुमार मीना, जेष्ठ विभागीय परिचालन प्रबंधक जय पाटील, अतिरिक्त परिचालन प्रबंधक विवेकानंद याना प्रत्यक्ष भेटून करण्यात आले.






सोबत नांदेड-गोवा, औरंगाबाद- नागपूर दरम्यान नवीन रेल्वे, मुंबई-जालना जनशताब्दी एक्सप्रेस हिंगोली किंवा वाशिम पर्यंत, जालना-छापरा रेल्वेला नांदेड येथून, जालना-तिरूपती रेल्वे ला औरंगाबाद येथून, अमरावती-पुणे रेल्वेचा पाच तासांचा लूज टाईम रद्द करून सदर रेल्वेला पुणे येथे दुपारी ११ चा पूर्वी पुण्याला पोहचविणे, नांदेड-पुणे रेल्वेचा लूज टाईम रद्द करून नांदेड येथून दुपारी 3.15 चा ऐवजी संध्याकाळी ५ ते ५.३० चा दरम्यान सोडणे, बेंगलूरू-नांदेड रेल्वेचा लूज टाईम रद्द करून सदर रेल्वे ला नागपूर पर्यंत वाढवणे, उन्हाळी सिजनचा लक्षात घेता मनमाड आणि लातूर मार्गे नांदेड-पुणे दरम्यान उन्हाळी विशेष रेल्वे चालवणे, मनमाड मार्गे नांदेड-बिकानेर, अकोला मार्गे नांदेड-छपरा दरम्यान नवीन गाडी, सोबत परळी-मिरज आणि पंढरपूर-हुबळी या दोन्ही रेल्वे गाड्यांना एकत्रित करून अकोला-हुबळी किंवा नांदेड-हुबळी दरम्यान नवीन दैनंदिन रेल्वे चालविण्याची मागणी करण्यात आली. यावेळी दमरेच्या अतिरिक्त व्यवस्थापकांनी ट्रेन ऑन डिमांड नावाखाली पुणे येथे नवीन गाडी सुरू करण्याचे आश्वासन दिले.







Post a Comment

0 Comments