Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ सेलूच्या नुतन संस्थेचे ग्रंथपाल डॉ. शिवाजी शिंदे जम्मू काश्मीर मध्ये "भारतीय एकता सन्मान" या पुरस्कार 2022 ने सन्मानित





सेलू  ➡️ जम्मू काश्मीर राज्यातील श्रीनगर येथे सेलूच्या नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचलित श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेच्या स्व.दुर्गाताई द.कुलकर्णी स्मृति ग्रंथालयाचे ग्रंथपाल डॉ. शिवाजी रामभाऊ शिंदे यांना राष्ट्रिय एकता सन्मानाने सन्मानित करण्यात आले. (vnsnews-24, feature, parbhani ) 



भारतीय स्वंतत्राच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त तथा भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 147 व्या जयंतीनिमित्त भारतीय एकता सन्मान 2022 या वर्षी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्यातुन परभणी जिल्ह्यातील नूतन शिक्षण संस्थेतील लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेच्या स्व.दुर्गा द.कुलकर्णी स्मृति ग्रंथालयाचे ग्रंथपाल डॉ. शिवाजी रामभाऊ शिंदे यांना "भारतीय एकता सन्मान" या पुरस्काराने दि. 20 नोव्हेंबर 2022 रोजी महांत रामेश्वरदासजी महाराज, श्री श्री श्री 108 भूपेंद्रदासजी महाराज,जम्मू काश्मीर राज्याच्या वक्फ बोर्डाच्या कॅबिनेट मंत्री मा.ना. डॉ.दर्शना अमरादाबी, जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री मा.कविंदर गुप्ता आचार्य डॉ.राजू शास्त्री,जम्मू काश्मिरचे प्रमुख जर्नालिस्ट सोहेल काजमी, आदी मंत्रिगण मान्यवर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.(vnsnews-24, feature, parbhani ) 






हा पुरस्कार देशातील विविध राज्यातील कला, क्रीडा, संगीत, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रात चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रदान करण्यात आला. या पुरस्काराने सेलू शहराचे, नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे, प्रशालेच्या ग्रंथालयाचे नाव जम्मू काश्मीर पर्यंत सन्मानाने पोहचले याचा सार्थ अभिमान वाटतो. 





याबद्धल संस्थेचे माजी सचिव आदरणीय द.रा.कुलकर्णी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉ. एस.एम.लोया,उपाध्यक्ष डी.के. देशपांडे सर,सचिव डॉ.व्ही.के.कोठेकर सर,सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी सर,शालेय समिती चे अध्यक्ष नंदकिशोरजी बाहेती, संस्थेचे कार्यकारणी सदस्य माजी प्राचार्य शरद कुलकर्णी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका संगीता खराबे,उपमुख्याध्यापक दत्ता घोगरे,पर्यवेक्षक रोहिदास मोगल,कार्यालयीन मुख्य लिपिक अनंत बोराडे,वरिष्ठ लिपिक निखिल झुटे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले.




Post a Comment

0 Comments