Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

vnsnews-24 | education | degalur | शौर्य आणि बलिदानाचे फलित म्हणजे स्वातंत्र्य - डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन




देगलूर ➡️ केवळ अर्ज विनंती आणि याचना करून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले नसून स्वातंत्र्यासाठी दीर्घ संघर्ष करावा लागला आहे. भारत मातेच्या अनेक सुपुत्रांनी इंग्रजांच्या गुलामगिरीतून या देशाला मुक्त करण्यासाठी आपल्या सर्वस्वाची आहुती दिली. लाखो भूमिपुत्रांचे राष्ट्राप्रती समर्पण, शौर्य आणि बलिदानाचे फलित म्हणजे भारताचे स्वातंत्र्य होय, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंग बिसेन यांनी केले.   



आजादी का अमृत महोत्सव निमित्त वै. धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या वतीने स्वाधीनता आंदोलन और हिंदी साहित्य या विषयावर आयोजित ऑनलाइन राष्ट्रीय चर्चात्रात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी सचिव मा. राजेश महाराज देगलूरकर,  उपप्राचार्य डॉ. भडके दिलीप,  उपप्राचार्य संजय अवधाने यांची ऑनलाईन उपस्थिती होती.  



या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय कुलकर्णी होते,  तर बीजभाषक म्हणून मध्य प्रदेशातील प्रसिद्ध हिंदी साहित्यिक आणि समीक्षक डॉ. श्रीराम परिहार उपस्थित होते.     पुढे बोलताना डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी स्वातंत्र्यलढ्यातील वीरांचे साहस, शौर्य आणि बलिदानाच्या स्मृतींना उजाळा दिला.   



या चर्चासत्राचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख डॉ. अभिमन्यू पाटील यांनी केले. सचिव मा. राजेश महाराज देगलूरकर यांनी आपल्या शुभेच्छा संदेशातून संशोधन आणि ज्ञान निर्मितीच्या दृष्टीने चर्चासत्राचे महत्त्व अधोरेखित केले.  



डॉ. श्रीराम परिहार यांनी आपल्या बीजभाषणातून  हिंदी  भाषेतील विविध साहित्याचे दाखले देत भारतीय स्वातंत्र्यलढ्याला गतिमानता प्राप्त करून देण्यात हिंदी साहित्यिकांची अत्यंत महत्त्वाची भूमिका असल्याचे नमूद केले. प्राचार्य डॉ.विजय कुलकर्णी यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपपर भाषणात इतिहास आणि साहित्य परस्पर पूरक असून इतिहासाच्या निर्मितीमध्ये साहित्यिकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे विशद केले.   



या चर्चासत्राचे सूत्रसंचालन डॉ. पुष्पा गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. अनिल जाधव यांनी केले. हिंदी विभागातील प्रा. चन्नबसव मठदेवरु यांनी मान्यवर पाहुण्यांचा परिचय करून दिला. या चर्चासत्रात महाराष्ट्रासह विविध प्रांतातील आपला सक्रिय सहभाग नोंदवला. प्रा. विश्वंभर तिडके यांनी या चर्चा सत्राची तांत्रिक बाजू सांभाळली.






Post a Comment

0 Comments