परभणी ➡️ परभणी महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नांदेड- वाघाळा येथील महापालिका आयुक्त सुनील लहाने यांची नियुक्ती करण्यात आली होती; परंतु नगर विकास मंत्रालयाने 30 ऑगस्ट रोजी रात्रीच या आदेशात अंशतः बदल करीत पनवेल महानगरपालिके अंतर्गत अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांची परभणी महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती केली आहे.
परभणी महानगरपालिकेचे आयुक्त देविदासराव पवार यांची राज्य सरकारने बदली केली असून त्या जागी पनवेल महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांची नियुक्ती केली आहे. परभणीच्या मा. आयुक्त देविदास पवार यांच्या बदलीच्या ठिकाणाबाबत अजून सरकार तर्फे कोणते आदेश प्राप्त झाले नाही.
0 Comments