Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

💎 17 जिल्ह्यातील नगरपालिका निवडणूकांना स्थगिती राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय




  

मुंबई  ➡️ 17 राज्यातील 92 नगरपालिका व 4 नगरपंचायतीमधील सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या कार्यक्रमास राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती बहाल केली आहे. राज्य निवडणूक आयोगाचे अव्वर सचिव संजय सावंत यांनी गुरुवारी (दि.14) जिल्हाधिकार्‍यांना पत्र पाठवून 8 जूलै 2022 रोजीच्या आदेशान्वये देण्यात आले.



राज्यातील सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगांव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती व बुलढाणा आदी 17 जिल्हातील 92 नगरपरिषदा व 4 नगर पंचायतीमधील सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम - 2022 याद्वारे स्थगित करण्यात येत आहे, असे कळविले. सुधारीत निवडणूकीचा कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल, असे नमूद करीत निवडणूक कार्यक्रम स्थगित झाल्यामुळे वरील सर्व क्षेत्रातील आचारसंहिताही लागू राहणार नाही, असे नमूद केले.




दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका क्रमांक 19756/2021 ची सुनावनी ही 12 जूलै 2022 रोजी झाली. त्यावेळी शासनाने समर्पित आयोगाने नागरीकांच्या मागास प्रवर्गाबाबत दिलेला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. न्यायालयाने या संदर्भातील पुढील सुनावनी 19 जूलै रोजी ठेवली आहे. या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय आयोगाने घेतला.







Post a Comment

0 Comments