Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

महाराष्ट्र राज्य सिनियर अजिंक्यपद स्पर्धेला खेळाडूंचा दणदणीत प्रतिसाद





 नागपूर  ➡️ सुमारे 02 वर्षांच्या कालावधीनंतर महाराष्ट्रात बॅडमिंटन स्पर्धांचे पुनरागमन होत आहे आणि नागपूर येथे 27 फेब्रुवारी ते 02 मार्च 2022 दरम्यान होणाऱ्या योनेक्स सनराइज खुल्या अजिंक्यपद स्पर्धेला खेळाडूंनी उदंड प्रतिसाद देऊन आपण स्पर्धेसाठी किती भुकेले होतो हेच जणू काही सिद्ध केले आहे. या स्पर्धेत सुमारे 650 पेक्षाही जास्त प्रवेशिका आल्या असून नागपूर येथे माणकापूर  क्रीडा संकुलात होणाऱ्या स्पर्धेला "10" बॅडमिंटन कोर्टस् हे वापरण्यात येणार आहेत, असे स्पर्धा-सचिव मंगेश काशिकर यांनी सांगितले.





आतापर्यंत महाराष्ट्र खुल्या सिनियरअजिंक्यपद स्पर्धेला सुमारे 300 खेळाडूंचा सहभाग आणि  प्रतिसाद लाभत असे परंतु यंदा नाटेकर स्मृती स्पर्धेला दुपटीहूनही अधिक 650 प्रवेशिका आल्या आहेत. या स्पर्धेचे मानांकन पुरुषांच्या गटात पुरुष एकेरी मधल्या गटामध्ये पुण्याच्या आर्य भिवप्तकी याला दिले आहे तर दुसरे मानांकन अभिषेक कुलकर्णी या पुण्याच्याच खेळाडूला मिळाले आहे. 





पहिल्या दिवशी पुरुष एकेरीचे सुमारे 03 राऊंड्स खेळवण्यात असून या स्पर्धेला यॉनेक्स ची एस-02 शटल्स  वापरण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे खेळाडूंच्या आगमनासाठी माणकापूरयेथील क्रीडा संकुलात जय्यत तयारी केली गेली असून खेळाडूंच्या आगमनाची नागपूरकर उत्सुकतेने वाट पाहत आहेत.






या स्पर्धेचे उद्घाटन दिनांक: 27 फेब्रुवारी रोजी केंद्रिय पाटबंधारे मंत्री श्री. नितीनजी गडकरी करणार असून समारोपाला देखील राज्याचे क्रीडामंत्री तसेच श्री. गौरव नाटेकर हे उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेचे अध्यक्षद महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन अध्यक्ष अरुण लखानी यांच्या कडे असून त्यांनी या स्पर्धेला खेळाडूंसाठी सर्व प्रकारच्या सुविधा पुरवल्या जातील तसेच शासनाच्या नियमानुसार करोनाचे सर्व नियम कसोशीने पाळले जातील असे स्पष्ट केले आहे.





या स्पर्धांनी महाराष्ट्रातला बॅडमिंटनचा हंगाम पुन्हा सुरू होत असून या नंतरच्या कालावधी मध्ये ज्युनिअर गटासाठी देखील दोन- दोन स्पर्धांचे आयोजन केले जाईल असे "महाराष्ट्र बॅडमिटन असोसिएशनचे सह-सचिव श्रीकांत वाड यांनी सांगितले आहे. सर्व खेळाडू या स्पर्धेची उत्सुकतेने वाट बघत असून या स्पर्धला रोख सुमारे 2.5 लक्ष रकमेची बक्षिसे ही देण्यात येणार आहेत.




महिला गटात हा मान पुण्याच्या नेहा पंडित आणि पूर्वा बर्वे यांनी मिळविला आहे. पुरुष दुहेरीत ठाण्याची जोडी विघ्नेश देवळेकर आणि दीप रांभिया हे अग्रकमय असून मिश्र दुहेरी मध्ये प्रतिक रानडे आणि अक्षीन शेट्टी ही ठाण्याचीच जोडी दुसऱ्या क्रमांकावर आहे. 




महिला दुहेरी मध्ये अग्रमानांकित जोडी आहे ठाण्याची सिम्रन सिंघी आणि नागपूरची रितिका ठक्कर व दुसऱ्या स्थानावर आहेत वि. हारिका व अक्षया वारंग ही ठाणेकर जोडी आणि त्याचप्रमाणे मिश्र दुहेरी मध्ये प्रतिक रानडे आणि अक्षया वारंग या ठाणेकर जोडीला प्रथम मानांकन मिळाले असून दुसऱ्या स्थानावर ( दुसऱ्या सीडेड वर आहे ) विघ्नेश देवळेकर आणि संयोगिता घोरपडे ही ठाण्याचीच जोडी. 




Post a Comment

0 Comments