Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणीत आघाडीच्या मंत्र्यांना प्रवेश बंद - भाजप




 परभणी  ➡️ महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात ईडीने केलेल्या अटकेच्या कारवाईच्या कारणावरुन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मलिक यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी आज 24 फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पक्षाच्या संतप्त पदाधिकार्‍यांनी जिल्हा प्रशासनास निवेदन देऊन केली.



या निवेदनात जोपर्यंत आघाडी सरकार मलिक यांचा राजीनामा घेणार नाही, तोपर्यंत एकाही मंत्र्यास परभणी जिल्ह्यात फिरकू दिले जाणार नाही, असा इशाराही या पदाधिकार्‍यांनी दिला. 



जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, माजी आमदार मोहन फड, प्रदेश कार्यकारिणी सदस्य संतोष मुरकूटे, डॉ. जगदिश शिंदे, बाळासाहेब जाधव, बाळासाहेब भालेराव, सुरेश भूमरे, शिवाजीराव मरगिळे आदींनी जिल्हा प्रशासनास सादर केलेल्या निवेदनातून मलिक यांचे अंडरवर्ल्डशी थेट संपर्क असल्याचे पुरावे सापडले आहेत.




या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात जोरदार निदर्शने केली. त्यामुळे त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणेही गरजेचे आहे. 



वास्तविकतः देशाला घातक असणार्‍या मंत्र्यांच्या पाठीशी राहून आघाडीतील तीनही घटकपक्षांनी काय साध्य केले आहे, असा प्रश्‍न उपस्थित करीत या पदाधिकार्‍यांनी मलिक यांचा राजीनामा घ्या, अन्यथा भाजप प्रखर आंदोलन उभं करेल, असा इशारा दिला.



    




Post a Comment

0 Comments