Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

सापडलेली रोख पोलिस स्टेशनमध्ये जमा करून नूतनच्या लिपीकाने दाखवले प्रामाणिकपणा व माणुसकी




 


 सेलू  ( श्रीपाद रोडगे ) ➡️ सध्याचा काळात प्रामाणिकपणा, इमानदारी, माणुसकी असणाऱ्या व्यक्ती आपल्या भोवताली शोधूनही सापडत नाहीत. एवढ्या दुर्मिळ झाल्या आहेत. परंतु नुतन शिक्षण संस्थेचे कर्मचारी प्रसाद कांयदे व त्यांचे सहकारी आकाश आम्ले यांनी 16 हजार 300 रुपये रोख रक्कम पोलीस स्टेशनमध्ये जमा करून माणूसकी व प्रामाणिकपणा अजून ही शिल्लक असल्याचे दाखवून दिले.




नूतन विद्यालयातील लिपिक प्रसाद कायंदे त्यांच्या सोबत आकाश आमले यांना बसस्थानकासमोर दुपारी 16 हजार 300 रु. रोख रक्कम सापडले. त्यांनी त्यासंदर्भात बसस्थानक परिसरात विचारपूस केली असता कोणाचे रुपये आहेत ते काही कळाले नाही. त्यांनी तत्परतेने ती रक्कम सेलू पोलिस स्थानकातील अधिकारी यांच्या जवळ सुपूर्त केले.




त्यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याबद्दल प्रसाद कायंदे व आकाश आमले खूप खूप अभिनंदन ! त्यांच्या या कार्याबद्दल नूतन विद्यालय शिक्षण संस्था पदाधिकारी व नूतन विद्यालय शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सर्वच वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.







Post a Comment

0 Comments