🔯 श्रीपाद रोडगे 🔯
सेलू ➡️ आज शहरातील हुतात्मा बहिर्जी शिंदे चौकातील ऐतिहासीक घडी टॉवर मधील हुतात्मा बहिर्जी शिंदे (नायक) व मोंढा परिसरातील महात्मा गांधी यांच्या अर्धा कृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तसेच हुतात्मा स्मारका मधील हुतात्मा स्तांभास अभिवादन करण्यात आले. या वेळी माजी सैनिक सखाराम महाजन यांनी हुतात्म्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला आणि हुतात्मा स्मारक येथे आदरांजली वाहण्यात आली.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, माजी सैनिक सखाराम महाजन, विठ्ठलसिंह ठाकुर, रघुनाथ देशमुख, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, अखिल भारतीय ग्राहक पंचायत ता.अध्यक्ष सतीश जाधव, बालासाहेब सरकाळे, सरपंच महादेवजी लोंढे, प्रसाद खारकर, बाळासाहेब काष्टे, सुयश पटवारी, सुरज काळदाते, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
0 Comments