Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

जेष्ठांचे लसीकरण करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा - सीईओ शिवानंद टाकसाळे





परभणी ➡️ कोरोनाच्या प्रादुर्भावा पासून जेष्ठ मंडळींचे सरंक्षण व्हावे म्हणून त्यांचे लसीकरण करून घेण्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केले आहे.

🔸️🔹️🔸️🔹️🔸️🔸️🔹️🔸️🔹️🔸️🔹️🔸️🔹️🔸️🔹️🔸️🔹️🔸️🔹️🔸️🔹️🔸️

दि. 1  एप्रिल 2021 पासून 45 वर्ष वयोगटावरील नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या व आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आवर्जून लस घ्यावी...

शिवानंद टाकसाळे, 
मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद, परभणी.

🔸️🔹️🔸️🔹️🔸️🔸️🔹️🔸️🔹️🔸️🔹️🔸️🔹️🔸️🔹️🔸️🔹️🔸️🔹️🔸️🔹️🔸️
दिनांक 30 मार्च 2021 रोजी परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण या ग्रामपंचायती मध्ये  65 वर्षे वयो गटावरील जेष्ठ नागरिकांसाठी कोविड - 19 लसीकरणाचे आयोजन मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. 


जेष्ठ मंडळी व गावातील नागरिकांशी संवाद साधताना टाकसाळे म्हणाले की, आपल्या वाड वडिलांची सेवा करणे आपले प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्यमान कसे उंचावता येईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे जेष्ठ मंडळींचे शंभर टक्के लसीकरण करून घेण्यासाठी युवकांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे. तसेच टाकसाळे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांशी देखील संवाद साधला.


यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेश देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके, शिक्षणाधिकारी डॉ सुचिता पाटेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी शंकरराव देशमुख, गट विकास अधिकारी अनुप पाटील, तालुका आरोग्य अधिकारी रावजी सोनवणे, सरपंच प्रभुलाल जैस्वाल, माजी उपसभापती गिन्यांनदेव दंडवते, माजी जिल्हा परिषद सदस्य टी एम सामाले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सदाशिव देशमुख, ग्राम विकास अधिकारी पंजाब देशमुख, स्वच्छ भारत मिशन कार्यालयाचे ज्ञानेश्वर गायकवाड, परमेश्वर हलगे, आरोग्य विभागाचे सोमवंशी यांच्यासह आदींची उपस्थिती होती.






Post a Comment

0 Comments