Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणी जिल्ह्यात 392 व नांदेड जिल्ह्यात 1 हजार 310 जणांना कोरोनाची लागण





परभणी जिल्ह्यात सोमवारी 06 कोरोनाबाधितांचा मृत्यू;  392 जण बाधितांची भर  

परभणी ➡️ जिल्ह्यात कोरोना हाहाकार उडू लागला असून सोमवारी (दि. 29) तब्बल 392 कोरोनाबाधीत आढळले असून सहा कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला. तर 166 कोरोनामुक्त व्यक्तींना सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.

रुग्णालयातील कक्षात दोन हजार 41 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 399 कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत 13 हजार 580 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी 11 हजार 140 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. रुग्णालयातर्फे आतापर्यंत 1 लाख 64 हजार 880 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात 1 लाख 50 हजार 719 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर 13 हजार 427 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह, 594 अनिर्णायक व 140 नमुने नाकारल्या गेले असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी प्रसिध्द केलेल्या प्रेसनोटद्वारे कळविले आहे.

नांदेड जिल्ह्यात आज 1 हजार 310 व्यक्ती कोरोना बाधितांची भर, 18 जणांचा मृत्यू

नांदेड ➡️ नांदेड जिल्ह्यात रविवार 28 मार्च 2021 रोजी 1 हजार 310 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. हे अहवाल 4 हजार 299 तपासण्यांमधून आले असून यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 576 तर अँटिजेन तपासणीद्वारे 734 अहवाल बाधित आहेत. आजचे 1 हजार 310 बाधित मिळून जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 39 हजार 908 एवढी झाली आहे. 


आज 18 जणांचा मृत्यू

गुरुवार 25 मार्च 2021 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे चिखलवाडी नांदेड येथील 74 वर्षाचा पुरुष, शुक्रवार 26 मार्च रोजी सिद्धीविनायक अपार्टमेंट नांदेड येथील 58 वर्षाची महिला, लोहा तालुक्यातील चितळी येथील 60 वर्षाची महिला, इंदिरानगर लोहा येथील 55 वर्षाचा पुरुष, सिडको नांदेड येथील 25 वर्षाचा पुरुष, लोहा तालुक्यातील बोरगाव येथील 65 वर्षाचा पुरुष, तरोडा बु नांदेड येथील 76 वर्षाचा पुरुष, बळीरामपुर नांदेड येथील 50 वर्षाचा पुरुष, होळी नांदेड येथील 82 वर्षाचा पुरुष, तर शनिवार 27 मार्च रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे हिंगोली नाका नांदेड येथील 29 वर्षाचा पुरुष, भोकर येथील 52 वर्षाचा पुरुष, आंबेडकरनगर नांदेड येथील 65 वर्षाची महिला, भगतसिंगरोड नांदेड येथील 85 वर्षाचा पुरुष, गुरुद्वारा गेट नंबर 4 नांदेड येथील 50 वर्षाची महिला, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे दिलीपसिंग कॉलनी नांदेड येथील 70 वर्षाचा पुरुष, हदगाव कोविड रुग्णालय येथे हदगाव तालुक्यातील पाथरड येथील 60 वर्षाची महिला, हदगाव तालुक्यातील तामसा येथील 50 वर्षाची महिला तर पुर्णारोड नांदेड येथील 48 वर्षाचा पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 731 एवढी झाली आहे. 

आजच्या 4 हजार 299 अहवालापैकी 2 हजार 850 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 39 हजार 908 एवढी झाली असून यातील 29 हजार 273 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 9 हजार 670 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 108 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

755 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 10, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 559, किनवट कोविड रुग्णालय 3, कंधार तालुक्यांतर्गत 9, धर्माबाद तालुक्यांतर्गत 9, देगलूर कोविड रुग्णालय 47, मुखेड कोविड रुग्णालय 22, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 11, हदगाव कोविड रुग्णालय 7, बिलोली तालुक्यांतर्गत 12, भोकर तालुक्यांतर्गत 5, माहूर तालुक्यांतर्गत 20, मांडवी तालुक्यांतर्गत 1, खाजगी रुग्णालय 40 असे एकूण 755 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 73.35 टक्के आहे.

1 हजार 310 व्यक्ती कोरोना बाधितांची भर

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 335, देगलूर तालुक्यात 28, धर्माबाद  6, किनवट 10, नांदेड ग्रामीण 11, लोहा 41, नायगाव 11, मुदखेड 20, हदगाव 36, कंधार 35, उमरी 5, हिंगोली 2, हिमायतनगर 22, अर्धापूर 9, भेाकर 4, परभणी 1 असे एकूण 576 बाधित आढळले. आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 475, बिलोली तालुक्यात 15, हिमायतनगर 4, मुदखेड 6, किनवट 40, नांदेड ग्रामीण 17, देगलूर 24, कंधार 3, मुखेड 21, आदिलाबाद 2, अर्धापूर 22, धर्माबाद 3, लोहा 25, नायगाव 10, यवतमाळ 3, भोकर 10, हदगाव 17, माहूर 8, उमरी 24, परभणी 5 असे एकूण 734 बाधित आढळले. 

9 हजार 670 बाधितांवर औषधोपचार सुरु

जिल्ह्यात 9 हजार 670 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 290, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 86, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 92, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 119, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 108, मुखेड कोविड रुग्णालय 163, देगलूर कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 28, जैनम-देगलूर कोविड केअर सेंटर 52, बिलोली कोविड केअर  सेंटर 144, नायगाव कोविड केअर सेंटर 63, उमरी कोविड केअर सेंटर 44, माहूर कोविड केअर सेंटर 17, भोकर कोविड केअर सेंटर 2, हदगाव कोविड रुग्णालय 33, हदगाव कोविड केअर सेंटर 53, लोहा कोविड रुग्णालय 97, कंधार कोविड केअर सेंटर 18, महसूल कोविड केअर सेंटर 97, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 7, धर्माबाद कोविड केअर सेंटर 67, मुदखेड कोविड केअर सेंटर 46, अर्धापूर कोविड केअर सेंटर 24, बारड कोविड केअर सेंटर 17, मांडवी कोविड केअर सेंटर 18, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 6 हजार 29, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 473, खाजगी रुग्णालय 482, लातूर येथे संदर्भीत 1 आहेत.






Post a Comment

0 Comments