Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

बाईक व ट्रॅक्टरमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत पत्नीचा मृत्यू तर पती गंभीर जखमी





परभणी ➡️ जिंतूर- परभणी मार्गातील मैनापुरी पाटीजवळ 29 मार्च रोजी सकाळी 5.30 वाजता बाईक व ट्रॅक्टरमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत पत्नीचा दुर्देवी मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या पती उपचारार्थ परभणी जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले.

पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार जिंतूर तालुक्यातील पिंपळगांव (काजळे)  येथील रहिवाशी  बबन चंदू राठोड  (45)  यांनी आपल्या गर्भवती सुनेला उपचारासाठी दोन दिवसांपूर्वी जिंतूर येथील सरकारी रुग्णालयात भरती केले होते. परंतु डॉक्टरांनी तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात रैंफर करण्याचा सल्ला दिला होता. आज 29 मार्च रोजी पहाटेच बाईकवर आपल्या सुनेला पाहण्यासाठी पत्नी शोभाबाई सोबत निघाले होते. परंतु सकाळी 5.30 वाजता जिंतूर-परभणी मार्गजवळ येताच अचानक समोरुन येणाऱ्या वाळुने भरलेला ट्रॅक्टर त्याला उडविले. त्यात शोभाबाईच्या (42) डोक्यावरून ट्रॅक्टरचा चाक गेल्यामुळे त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर बबन राठोड हे गंभीर स्वरूपात जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. याघटनेनंतर ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर सहित फरार झाला. जिंतूर सरकारी दवाखान्यात मयत शोभाबाईचे पोस्टमार्टम करण्यात आले. या संदर्भात जिंतूर पोलिस ठाण्यात बातमी लिहिपर्यंत जिंतूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद झाला नव्हता.


   




Post a Comment

0 Comments