Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

भाजपच्या नगरसेविकाच्या मुलाने केली आत्महत्या





पुणे
➡️ 
चिंचवडगावात तरुणाने स्वतःवर पिस्तुलातून गोळी झाडून घेतल्याची घटना रविवारी (ता.28) रात्री उशिरा घडली. गोळी झाडून घेतलेला तरुण पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका करुणा चिंचवडे यांचा मुलगा आहे. 21 वर्षीय प्रसन्न चिंचवडे (रा. चिंचवडेनगर, चिंचवड) असे या तरुणाचे नाव आहे.

प्रसन्नने त्याच्या वडिलांच्या पिस्तूलातून स्वतःवर गोळी झाडून घेतली. त्याला उपचारासाठी तात्काळ थेरगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत प्रसन्न गंभीर जखमी झाला आहे. उपचारासाठी त्याला थेरगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केल्याचे समजताच नातेवाईक आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात गर्दी केली. पण उपचारादरम्यान त्याचा पहाटे मृत्यू झाला. गोळी झाडून घेण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. चिंचवड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

प्रसन्न नवी कार खरेदी करण्यासाठी रविवारीच शोरुममध्ये जाऊन आला होता, पण घरी आल्यावर त्याने स्वत:वर गोळी का झाडून घेतली, याबाबत कुणालाच काही कल्पना नाही. त्याचा मनमिळावू आणि शांत स्वभाव होता, त्यामुळे आत्महत्या करण्यासाठी त्याने का पाऊल उचलले असावे, हे अद्याप समजू शकलेलं नाही.




Post a Comment

0 Comments