परभणी ➡️ महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन नागपूर जिल्हा शाखा परभणी येथील नूतन कार्यकारिणी मधील सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
दिनांक 26 जानेवारी 2021 रोजी जिल्हा परिषद सभागृह येथे जिल्हा परिषद परभणी कर्मचारी यांची नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणीचे अध्यक्ष गजानन लोंढे, कार्याध्यक्ष विलास चौधरी उपाध्यक्ष विशाल पाटील, सुरेश काशीकर, बी बी स्वामी, रमेश कच्छवे, शेख सगीर अहमद, सचिव विजय जोशी, सहसचिव रतन शिंदे, सुरेश पोटेकर, लक्ष्मीकांत शेळके, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर शेळके, सहकोषाध्यक्ष एम एच कादरी, व्यंकटेश जुकटे, जिल्हा संघटक आर सी नरगुल्ला, बी पी फड, महिला संघटक एस ए कदम, सुनिता चवळे, खैरूनबी सय्यद, श्रीमती सूर्यवंशी, तालुका समन्वयक मकरंद पिंपळगावकर - सेलू, पंडित पी बी - पूर्णा, परभणी, कुरेशी एस आय - जिंतूर, पेकम ए एन - गंगाखेड, सोनपेठ, पालम, प्रसिद्धी प्रमुख - रावसाहेब कुटे, अनिल पेदापल्ली यांची निवड करण्यात आली आहे.
तर विस्ताराधिकारी प्रतिनिधी - किशोर घोडके, मधुकर उमरीकर, वाहन चालक प्रतिनिधी - पंडित रेवनवार, रामेश्वर मुठाळ, चतुर्थश्रेणी प्रतिनिधी अंकुश वल्लमवाड, राजेश डुमलवाड, भास्कर रणेर, महादजी पिंपरे, राज्य कार्यकारिणी सदस्य डी एस उंदरे, कृष्णा सरकाळे, दिनेश थोरात, सलीम खान मुसाखान याप्रमाणे बिनविरोध निवडी करण्यात आल्या आहेत. नूतन कार्यकारिणीसाठी एम पी जुमडे, एम बी चांडगे, एन के कापसे, एन पी गुंडरे, व्ही व्ही कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले आहे
0 Comments