परभणी ➡️ आज गुरुवार रोजी ग्रामिण रुग्णालय जिंतुर येथे कोरोना लसीकरण मोहिमेस सुरवात करण्यात आली. यात पहिल्या टप्प्यात जिंतुर तालुक्यातील 47 आरोग्य अधिकारी व आरोग्य कर्मचारी याना लस देण्याची प्रक्रिया आज सुरू करण्यात आली. याप्रसंगी आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी उमाकांत पारधी उपविभागीय अधिकारी, मांडवगडे तहसीलदार साहेब, किशोर सुरवसे (RMO),वैद्यकीय अधीक्षक डॉ रविकिरण चांडगे, प्रमोद पाटील पोलीस निरीक्षक, नगराध्यक्ष कपिल फारुकी, डॉ बोराळकर THO , डॉ शिवप्रसाद सानप, डॉ कान्हडकर, रमेश दरगड, अकु लाला, नागेश आकात, वैद्यकीय अधिकारी डॉ वाल्हेकर, डॉ बामणे, डॉ भुते, डॉ भालेराव, डॉ गरड, विनोद राठोड, अनिल सावंत सर्व अधिपरिचरिका आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments