Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ राजीनाम्यासाठी उपसरपंच महिलेसह कुटुंबाला मारहाणीत मुलाचा मृत्यू





सेलू तालुक्यातील ब्राम्हणगावच्या सरपंचावर गुन्हा दाखल

सेलू - उपसरपंचपदाचा राजीनामा दे या कारणावरून सरपंचासह इतर जणांनी महिला उपसरपंच व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना ब्राम्हणगावात झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी निखील रमेश कांबळेचा उपचारदम्यान रविवारी रात्री मृत्यू झाला. याप्रकरणी 5 जणांविरुद्ध सेलू ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गावात पोलीस फौजफाटा तैनात असल्याने तणावपूर्ण शांतता आहे.





ब्राम्हणगावात 5 ऑगस्टला झालेल्या मारहाणीत जखमी झालेल्या उपसरपंच शशीकला रमेश कांबळे यांनी परभणी रूग्णालयात उपचारदम्यान दिलेला जबाब सेलू ठाण्यास रविवारी रात्री उशिरा मिळाला. या फिर्यादीत आरोपी सरपंच साधना डोईफोडे, केशव डोईफोडे, पुनम डोईफोडे, महादेव डोईफोडे, कौसाबाई डोईफोडे (सर्व रा.ब्राम्हणगाव) यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून शशिकला यांना उपसंरपचपदाचा राजीनामा दे या कारणावरून शिवीगाळ करून तिच्यासह तिचा पती व मुलास लाथा बुक्क्याने मारहाण केली. 



फिर्यादी शशिकला यांचा मोठा मुलगा निखील रमेश कांबळे यास रॉडने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याने त्याचा उपचारादरम्यान रविवारी रात्री मृत्यू झाल्याचे फिर्यादीने जबाबात म्हटले आहे. या गुन्ह्याची माहिती पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांनी पोलीस अधीक्षक आर. रागसुधा यांना दिली.



 

त्यांच्या आदेशानुसार आरोपी साधना डोईफोडे, केशव डोईफोडे, पुनम डोईफोडे, महादेव डोईफोडे, कौसाबाई डोईफोडे यांच्याविरूध्द सेलू ठाण्यात रविवारी मध्यरात्री विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मयत निखील कांबळे यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे ब्राम्हणगावात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून गावाला छावणीचे स्वरूप आले आहे.






Post a Comment

0 Comments