Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/जिंतूर वकील संघ नूतन कार्यकारिणीची निवड; अध्यक्षपदी ॲड. प्रकाश वाघमारे




जिंतूर ➡️  वकील संघ जिंतूर येथे 2023-2024 या वर्षासाठी दि. 15 मार्च रोजी निवडणुक पध्दतीने नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. या निवडणुकीत वकील संघाचे  मतदार सहभागी होते. गुप्त मतदानानुसार नवीन कार्यकारीणीची निवड करण्यात आली. (vnsnews-24, feature, jintur ) 



या निवडणुकीत जिंतूर वकील संघाचे अध्यक्ष म्हणून ॲड. प्रकाश वाघमारे, उपाध्यक्ष म्हणून ॲड. मो.पाशा देशमुख, सचीव म्हणून ॲड. गजानन शिवाजी नागरे व सहसचीव म्हणून ॲड. विष्णु जाधव यांची निवड झाली.  जिंतूर न्यायालयाचे न्यायाधीश एम. आर. पनाड यांनी स्वागत करून पुढील कार्यास सुभेच्छा दिल्या. 



निवडणुक अधिकारी म्हणुन ॲड. एम. डी. जोशी व ॲड. विनोद पाटील यांनी निवडणुक प्रकिया योग्य प्रकारे राबवली व काम पाहिले. नवीन कार्यकारिणीची निवड झाल्यानंतर सर्व वकील संघ सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.







Post a Comment

0 Comments