जिंतूर ➡️ तालूक्यातील आडगावबाजार येथिल अखंड हरिनाम सप्ताहाची दि.29 जानेवारी रोजी रविवारी भव्य दिंडी मिरवणूकीने सांगता झाली. (vnsnews-24, feature, jintur)
आडगावबाजार येथील हनुमान मंदिरात दि. 22 ते दि.29 जानेवारी दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यात ह.भ.प.गणेशानंद महाराज शास्त्री कोळसकर, ह.भ.प.नामदेव महाराज लबडे पंढरपूरकर, ह.भ.प. दादाराव महाराज कर्हाळे डिग्रसकर, ह.भ.प.बाबुराव महाराज तडसे पुसदकर, ह.भ.प.विठ्ठल महाराज जाधव आळंदीकर, ह.भ.प.नामदेव महाराज फपाळ, ह.भ.प.माऊली महाराज राऊत सातगावकर यांचे कीर्तन झाले.
तर दि. 29 जानेवारी रोजी रविवारी ह.भ.प.त्र्यबंक महाराज दस्तापूरकर यांचे काल्याचे कीर्तन झाले. तत्पूर्वी सकाळी काढण्यात आलेल्या दिंडी सोहळ्यात मुली, मुले, महिला व पुरुषांनी फुगड्या खेळून रंगत आणली.यात परिसरातील भाविकांची व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
0 Comments