Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ शिक्षकांचे प्रश्न विधानपरिषदेत निर्भीडपणे मांडून सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे एकमेव पर्याय विक्रम काळेच- आ.सतीश चव्हाण





🔶️विक्रम काळे यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन विक्रमी मताने विजय करून विक्रम करा

परभणी ➡️ सद्या विरोधकांकडे शिक्षकांचे प्रश्न मांडण्यासाठी कोणताही उमेदवार सक्षम नाही. त्यामुळे शिक्षकांच्या प्रश्नांची जाण  असणारे,अभ्यासु, शिक्षकांच्या सुख दुःखात सहभागी होणारे आणि विधानपरिषदेत शिक्षकांचे प्रश्न निर्भीडपणे मांडून ते सोडवण्यासाठी सातत्याने प्रयन्त करणारे केवळ विक्रम काळे आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या न्याय- हक्कासाठी लढणारा आपला आणि हक्काचा माणुस व एकमेव पर्याय म्हणून विक्रम वसंतराव काळे यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन विक्रमी मताने विजयी करुण विक्रम करावा असे आवाहन पदवीधर आ.सतीश चव्हाण यांनी उपस्थित  शिक्षकांना केले. (vnsnews-24, education, parbhani ) 





पूर्णा शहरातील श्री गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालयात( दी.17) रोजी औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघांचे महाविकास आघाडी व विविध शिक्षक संघटनाचे अधिकृत  उमेदवार आ .विक्रम वसंतराव काळे यांच्या प्रचार सहविचार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला प्रमुख मागर्दर्शक म्हणुन औरंगाबाद पदवीधर आ सतिश चव्हाण हे उपस्थित होते.





यावेळी अध्यक्ष स्थानी जेष्ठ संचालक उत्तमराव कदम, पूर्णा तालुका संस्था चालक प्रमोद अण्णा एकलारे, अमृतराज कदम, गोविंदराव कदम, डॉ. विनय वाघमारे, प्राचार्य मोहन मोरे, महाविकास आघाडीचे शहाजी देसाई ,अशोक बोकरे, श्रीधर पारवे, ओम गायकवाड, बंटी रणवीर, धनंजय रणवीर सर्व पदाधिकारी देवीदास उमाटे, दिलिप माने, तुकाराम चव्हाण, सिनेट सदस्य नारायण चौधरी, केशव अण्णा दुधा, मा.मा. सुर्वे, प्रकाश रवंदळे आदिंची उपस्थिती होती. 




याप्रसंगी स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड सिनेट पदी निवडुन आलेले. प्रा.डॉ.रामेश्वर पवार (व्यवस्थापन), प्रा. डॉ .विजय भोपळे (प्राध्यापक सिनेट) प्रा.डॉ.सुरेखा भोसले (विद्या परिषद )प्रा. डॉ.संजय दळवी, प्रा.डॉ.प्रभाकर कीर्तनकार (अभ्यास मंडळ ) यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन आ.सतीश चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 




यावेळी शहरासह, तालुक्यातील अनेक शिक्षकांची उपस्थिती होती. सुत्रसंचलन गोपाळ भुसारे तर आभार प्रा.डॉ.राजु शेख यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी शिक्षक संघ तालुका पदाधिकारी शिक्षक, शिक्षक कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.






Post a Comment

0 Comments