Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/जिंतूर तालुक्यातील पिंपळगाव तांडा येथे चिमुकलीसह मातेची तर कडसांवंगी येथे तरुणाची गळफास लावून आत्महत्या





🔶️जिंतूर तालुक्यात 24 तासात दोन आत्महत्येच्या घटना, दोन्ही घटनेत आत्महत्येचे कारण अस्पष्ट 

जिंतूर ➡️ तालुक्यात मागील 24 तासात दोन आत्महत्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये जिंतूर तालुक्यातील पिंपळगाव तांडा येथे चिमुकलीसह मातेची तर कडसांवंगी येथे तरुणाची गळफास लावून आत्महत्या केली आहे. दोन्ही घटनेत आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. जिंतूर  व बोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. (vnsnews-24, crime, jintur ) 





जिंतूर तालुक्यातील पिंपळगाव तांडा येथे मातेने आपल्या राहत्या घरात तीन महिन्याच्या चिमुकलीसह स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची  घटना दि. 18 जानेवारी रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास घडली असून दि. 19 जानेवारी हि घटना उघडकीस आली असून नेमके आत्महत्याचे कारण समजू शकले नाही.याबाबत जिंतूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला याबाबत पोलीस ठाण्यात गुन्ह्याची कसलीही नोंद झाली नव्हती. पायल उद्धवराव राठोड असे मृत मातेचे नाव असून कल्पना राठोड असे चिमुकलीचे नाव आहे.








तर दुसरी घटना जिंतूर तालुक्यातील बोरी पोलीस ठाणे हद्दीतील कडसांवंगी येथे घडली. यामध्ये एका बावीस वर्षीय  तरुणाने शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. गोपीचंद दतराव शेळके असे आत्महत्याग्रस्त तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच बोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत मुळे यांनी पोलिसांना घटनास्थळी  पोलिसांना पाठवून पंचनामा केला. सदर तरुणाच्या मृतदेहावर बोरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याबाबत बोरी पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.(vnsnews-24, crime, jintur ) 









Post a Comment

0 Comments