Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ महावितरण कंपणीच्या मराठवाडा विभागातील ११३ खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड




टेबल टेनिस स्पर्धेचा टास करून निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन करताना मुख्य अभियंता सुधाकर जाधव व इतर अधिकारी

नांदेड ➡️  महावितरण ही विजेसारख्या मूलभूत सेवाक्षेत्रात काम करणारी आशीया खंडातील अग्रगण्य कंपनी आहे. ग्राहक सेवे बरोबरच आपल्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक व शारिरिक आरोग्याच्या दृष्टिने सांस्कृतिक व क्रिडा स्पर्धा दरवर्षी मोठया उत्साहात घेत असते. या निमित्तानेच नांदेड परिमंडळाच्या यजमानपदाखाली विभागीय क्रिडा चाचणी स्पर्धांचे आयोजन पार पडले. या चाचणी मध्ये मराठवाडा विभागातील तब्बल ११३ महिला व पुरूष खेळाडूंची निवड करण्यात आली असून जानेवारी मध्ये जळगाव येथे पार पडणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शिफारस करण्यात आली आहे. (vnsnews-24, sports, nanded ) 






नांदेड परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता सुधाकर जाधव यांच्या मार्गदर्शनखाली तसेच मुख्य समन्वयक उपमुख्य औदयोगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील, महेंद्र बागूल, महेंद्र चुनारकर, सहाय्यक महाव्यवस्थापक सुशिल पावसकर, वरिष्ठ व्यवस्थापक सुदर्शन कालेवाड, विधी अधिकारी शैलेंद्र पाटील, लेखाधिकारी आरेकर, स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता गिल्लूरकर यांनी यशश्विरित्या सर्प्धेचे आयोजन केले. 






जिल्हा क्रिडा संकूल व सायन्स कॉलेजच्या मैदानावर दि.१० व ११ डिसेंबर रोजी तब्बल २३ प्रकारच्या विविध क्रिडा प्रकाराचा समावेश असलेल्या निवड चाचण्या स्पर्धा पार पडल्या. या मध्ये क्रिकेट-१३, कब्बडी, व्हॉलीबॉल, खो-खो, कुस्ती या प्रकारातील प्रत्येकी १० खेळाडू, बॅडमींटन-५, टेबलटेनिस-५, कॅरम-५ तसेच मैदानी प्रकारातील धावणे,उंच उडी,लांब उडी, गोळा फेक व भाला फेक या प्रकारातील एकूण ११३ महिला व पुरूष खेळाडूंची निवड करण्यात आली. मराठवाडा विभागातील एकूण आठ जिल्हयातील ४०० खेळाडूंनी या निवड चाचणीत सहभाग नोंदवला होता. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात या स्पर्धा पार पडल्या.


 





स्पर्धा यशश्वी करण्यासाठी प्रत्येक विभागाचे सर्व कार्यकारी अभियंता, उपविभागीय अधिकारी तसेच मानव संसाधन व लेखा विभागाचे अधिकारी यांनी परिश्रम घेतले त्याचबरोबर या निवड चाचणीचे प्रायोजक नांदेड क्रिटीकल सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक अमित कंठेवाड, निवासस्थानासाठी गुरूव्दारा समितीने मोलाचे सहकार्य केले. तसेच पंच म्हणून गुरूदीपसिंघ संधू, मोहन धोंगडे, संजय चव्हाण, डॉ. मुनिर सिंग, महेश वाकडकर, नरेश नरवाडे, इसाक खान, प्रकाश होणवडजकर, देशपांडे, वैभव दमकोंडवार व सुर्यकांत गच्चे यांनी काम पाहिले. (vnsnews-24, sports, nanded ) 










Post a Comment

0 Comments