परभणी ➡️ येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्रसेना विभागाच्या वतीने रन फॉर युनिटी या मोहिमेचे आयोजन 31 ऑक्टोबर रोजी सोमवार करण्यात आले होते. (vnsnews-24,| education, parbhani)
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त भारत सरकारने 'रन फॉर युनिटी' या राष्ट्रव्यापी मोहीमेचे आवाहन केले होते. महाराष्ट्र बटालियन एनसीसी नांदेडचे कमान अधिकारी- कर्नल एम. रंगाराव यांच्या आदेशान्वये श्री शिवाजी महाविद्यालय परभणी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी तसेच मराठवाडा हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने "एकता दौड" चे आयोजन करण्यात आले होते.
सदरील दौडला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी यांनी हिरवा झेंडा दाखवला. सहभागी ९५ कॅडेट्सनी ३ किमी दौड पूर्ण केली. यावेळी लेफ्टनंट डॉ. प्रशांत सराफ यांनी उपस्थितांना 'राष्ट्रीय'एकता शपथ' दिली.
सदरील कार्यक्रमास लेफ्टनंट डॉ.जयकुमार देशमुख, फर्स्ट ऑफिसर शिरीष जयपुरकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे डॉ.तुकाराम फिसफिसे, प्रा.राजेसाहेब रेंगे, डॉ.प्रल्हाद भोपे यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिनिअर अंडर ऑफिसर चंद्रकांत सातपुते, अभिषेक भोसले, ज्युनिअर अंडर ऑफिसर अजिंक्य कानबाले, धनराज घूट्टे, ऋषुभ रणवीर, वैभव चातेकर, शेख समीर, चक्रधर जावळे आदींनी प्रयत्न केले.(vnsnews-24,| education, parbhani)
x
0 Comments