याबाबत अधिक माहिती अशी की, पूर्णा तालुक्यातील पिंपळा लोखंडे येथील मयत कलावती उर्फ कान्होपात्रा बबन जाधव (वय वर्षे 30) या महिलेस सावत्र दोन मुले व तिच्या स्वतःची दोन मुली असा स्वतःचा परिवार आहे. परंतु मागील काही दिवसापासून ती परिवारांना जगविण्याच्या कारणावरून आर्थिक अडचणीत होती. त्यामुळे तिने या आर्थिक कारणाला कंटाळून रविवारी (दि.30) स्वतःच्या शेताच्या मालकीत असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. (vnsnews-24, crime, parbhani)
या घटनेची माहिती तिचा पुतण्या प्रकाश रुस्तुम जाधव यांनी चुडावा पोलिसांना दिली. चुडावा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद मुळे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी चुडावा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहे. (vnsnews-24, crime, parbhani)
0 Comments