परभणी ➡️ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेल्या सेवा पंधरवाड्यात भारतीय जनता पक्षाचे महानगर उपाध्यक्ष कमलकिशोर अग्रवाल यांनी दोन मुलींना दत्तक घेवून शिक्षणाची सर्वतोपरी जबाबदारी स्विकारली आहे.
छत्रपती शाहू विद्यालयातील दोघा गरजवंत मुलींना दत्तक घेवून अग्रवाल यांनी या दोन्ही मुलींच्या शिक्षणाच्या खर्चाची पूर्ण जबाबदारी स्विकारली.
यावेळी सहसंयोजक संजय रिझवानी, भालचंद्र गोरे, प्रदेश कार्यकारणी सदस्य संजय शेळके, प्रदीप तांदळे, संतोष सोनवणे, गजानन काळे, विजय गायकवाड, संतोष जाधव, उमेश शेळके, वैजनाथ दहिफळे, डॉ. मनोज पोरवाल, बाळासाहेब राजूरकर, मुख्याध्यापिका छाया गरुड, अनंतराव किरडे, सुरेश रणेर यांच्यासह अन्य उपस्थित होते. vnsnews-24 | education | parbhani |
0 Comments