आज मानाची पूजा महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायत कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष के.के. आंधळे व महापालिकेचे सेवानिवृत्त ज्येष्ठ कर्मचारी डी.बी. देवकर यांच्याहस्ते करण्यात आली.
यावेळी सहाय्यक आयुक्त शिवाजी सरनाईक, नगरसचिव विकास रत्नपारखे, आरोग्य विभागाचे समन्वयक गजानन जाधव, लेखा विभागाचे सहाय्यक लेखाअधिकारी भगवान यादव, कर अधिक्षक अल्केश देशमुख, मनोज खानापूरकर, रमेश चव्हाण, उमेश जाधव, राजाभाऊ मोरे, अमोल सोळंके, बाबाराव आघाव, युवराज साबळे, शिंदे, माहिती व जनसंपर्क अधिकारी राजकुमार जाधव, प्रल्हाद देशमाने, किशन देशमुख, भागवत, राजाभाऊ कानखेडे, श्रीकांत कुर्हा, मनोज तळेकर, कैलास ठाकूर, राजू देशमुख, भांडारपाल रामेश्वर कुलकर्णी, गुरु पाठक आदींच्या उपस्थितीत श्रींची आरती संपन्न झाली.
सर्व अधिकारी कर्मचार्यांनी रोज सकाळी 10 वाजता व सायंकाळी 6.30 वाजता आरतीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन अधिकारी कर्मचारी गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments