पालम [आरूणा शर्मा ] ➡️ येथे दिनांक 31 जुलै रोजी सकाळी 7 वाजता महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार हे नांदेड कडून गंगाखेडकडे जात असताना पालमच्या मुख्य चौकात तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी पालमच्या वतीने तालुक्याच्या विविध विकास कामाबाबतचे निवेदन देण्यात आले. यावेळी पालम राष्ट्रवादीचे तालूका अध्यक्ष वसंतराव काका सिरस्कार यांच्याशी विकासकाम बाबत अजित पवार यांनी चर्चा केली.
या वेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष वसंतराव सिरस्कार, शहर अध्यक्ष इमदाद खान पठाण, सभापती प्रभाकर सिरस्कर, सय्यद विखार, माऊली घोरपडे,नगरसेवकसंजय थिट्टे सुगंध हिवरे,सह केशवराव कराळे,दत्तराव घोरपडे, बन्सी रोकडे, दिलीप रोकडे, रईस खुरेशी, शेख मगदुम, सगीर सरवरी, सय्यद फारूख, मोहम्मद चाऊस सह तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदधिकारी व नागरीक उपस्थित होते. यावेळी सकाळी 6 वाजल्या पासून पालम पोलीस निरक्षक प्रदिप काकडे यांच्या मार्गदर्शना खाली मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आले.
0 Comments