परभणी ➡️ शहरातील लोकमान्य नगरात चोरट्यांनी 3 घरे फोडल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार लग्नानिमित्त 26 मे रोजी नानासाहेब नारळे हे निवृत्त शिक्षक सहकुटुंब गावाला गेले होते. त्यांचे किरायदर भागवत कवर हे जायकवाडीमध्ये नोकरीला आहेत. ते पण 27 मे रोजी गावाकडे गेले होते. त्यांच्या घराच्या मागील बाजूस मंजुषा ढोले यांचे घर आहे.
ते घरात असताना त्यांच्या बाजूच्या लॉक असलेल्या 3 रूम चोरट्यांनी फोडल्या. पोलिस पथकाने पाहणी केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
या आधी सहकार नगरामध्ये भरदिवसा घरफोडी करत अज्ञात चोरट्यांनी सोन्या- चांदीचे दागिने , रोख रक्कम , पिस्तूल , चार जीवंत काडतूसे असा एकुण एक लाख 28 हजार 626 रुपयांचा मुद्देमाल पळविला आहे. यात चोरट्यांनी एक पिस्तुल, 04 जीवंत काडतूसे चोरुन नेल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांवर नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
0 Comments